
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:-महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर कट्टा’ या उपक्रमाच्या महाविद्यालयीन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सदरील स्पर्धेत भूम येथील शंकरराव पाटील महाविद्यालयाने जिल्ह्यात प्रथम व विभागीय पातळीवर द्वितीय क्रमांक पटकावला.
या उपक्रमाअंतर्गत विविध कोर्सेस चे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्यात येते सक्रिय सहभाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ होतो.
उद्योजक आपल्या भेटीला व IAS आपल्या भेटीला असे मुख्य दोन उपक्रम राबवले जातात. तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अवलंबिले आहे त्यानुसार कौशल्य विकास कोर्सचे पण आयोजन करण्यात येते.
महाविद्यालयाच्या या यशस्वीतेसाठी विद्या विकास मंडळ, पाथरूडचे सर्व मान्यवर पदाधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ श्रीकृष्ण चंदनशिव व समन्वयक डॉ नितिन पडवळ व प्रा. गौतम तिजारे, प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी विशेष परिश्रम घेतले..