
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
नांदेड:लोहा :- भोपाळवाडी येथील बळीराम पाटील प्राथमिक शाळेच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध वैयक्तिक, सामुहिक सांस्कृतिक कार्यक्रम व गुणवत्तेवर आधारित घेण्यात आलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण व सांस्कृतिक कला महोत्सव-जानेवारी 2023 या कार्यक्रमासाठी उदघाटक मा.श्री. मारोतीराव पाटील घोरबांड साहेब व प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अमीणजी पठाण साहेब, केंद्रप्रमुख अशोकजी आढाव साहेब, श्री.शंकरराव घोरबांड , श्री.दिलीप भोपाळे , श्री.शंकर पाटील घोरबांड, श्रीमती कंधारे मॅडम,सौ.पिटलेवाड मॅडम , श्री.टोम्पे सर,मु.अ.श्री.माधव भोपाळे सर तसेच भोपाळवाडी , कलंबर खुर्द, कलंबर बु,आबादानी ,गुंडेवाडी ,करडे वाडी येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून छोट्या चिमुकल्यांची कला सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी केली होती तसेच त्यांनी लहान मुलांचे कौतुक केले.