
दैनिक चालू वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्पदंश चिकित्सा व उपचार समितीचे सदस्य मुखेडचे मानबिंदू डॉ. दिलीप पुंडे यांच्यातर्फे कै. मातोश्री भिमाई पांडुरंगराव पुंडे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी मुखेड मध्ये व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते.
शहरातील कोत्तावार ऑइल मिल मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेटमोगरा येथील शिवलिंग मठ संस्थानचे प्रमुख श्री सिद्धदयाल शिवाचार्य महाराज हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज,नामदेव महाराज दापकेकर,माजी आमदार कर्मवीर किशनराव राठोड उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून इंद्रजीत देशमुख यांची उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमाच्या विशेष सत्कारमूर्ती म्हणून पॅरा ऑलम्पिक विजेत्या कु. भाग्यश्री जाधव होनवडजकर या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात माता भिमाई व पिता गुरुवर्य पांडुरंग पुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे उपस्थित पत्रकार यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर या कार्यक्रमातील विशेष सत्कारमूर्ती पॅरॉऑलम्पिक विजेत्या कु. भाग्यश्री जाधव यांना गुरुवर्य पांडुरंगराव पुंडे पुरस्कार आकर्षक असे सन्मानचिन्ह ट्रॉफी प्रमाणपत्र व ११००० रुपयाची राशी देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला.या प्रसंगी आपल्या आयुष्यातील संघर्षाची जीवनगाथा तसेच यशस्वी क्रीडा विश्वातील घोडदौडची कहानी स्क्रीन वरून व स्वतः त्यांच्या मुखातून ऐकताना श्रोते अक्षरशः गहिवरून गेले होते. शेवटी त्यांनी मी ऑलम्पिक मध्येही पदक मिळवून भारताचे व राज्याचे तसेच गावचे नाव उज्वल करीन असेही त्या म्हणाल्या.या कार्यक्रमात अकरावे पुष्प ‘पसायदान’ या विषयावर आयोजित प्रख्यात वक्ते आदरणीय इंद्रजीत देशमुख आले त्यांनी आपल्या प्रभावी वाणीने उपस्थित सर्व श्रोत्याना मंत्रमुग्ध केले. पसायदानाची महानता सांगताना सोप्या भाषेत सोदाहरणासह पटवून देताना माऊलीची महानता त्यांच्या वाणीतून ओजस्वीपणे वाहत होती. ऐकताना श्रोते तल्लीन झाले होते. येणाऱ्या पिढीसाठी चांगलं विश्व निर्माण करा.त्यानंतरच मूल जन्माला येऊ द्या हा संदेश देताना माऊलीने विश्वात्म्यक देवाकडे हेच मागणे आपल्या पसायदानाच्या आर्जवातून केल्याचे सांगून माऊलीची आर्तता समजून घ्या. त्याचे आचरण करा. आपल्या जीवनात परिवर्तन घडून द्या असे सांगितले.
डॉ.दिलीप पुंडे साहेबांनी अगदी योग्य व्यक्तीला पुरस्कारासाठी व पसायदान विषयासाठी इंद्रजीत देशमुख यांना निवडल्याबद्दल उपस्थितांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत होता.
प्रा. डॉ. रामकृष्ण बदने यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन करून श्रोत्यांचे आभार मानले.
यावेळी प्राचार्य डॉ. हरिदास राठोड, बळवंत पाटील बेटमोगरेकर, संतोष बोनलेवाड,सुभाष पाटील दापकेकर, जगदीश बियाणी, नंदकुमार मडगूलवार, दिलीप कोडगिरे, सुरेश आंबुलगेकर, सुभाष पाटील दापकेकर, डॉ. व्यंकट सुभेदार,नासिरखां पठाण, शिवाजी आंबुलगेकर यांनी भाग्यश्री जाधव यांच्या मानपत्राचे वाचन केले. यावेळी अनेक मान्यवर पत्रकार बंधू उपस्थित होते.
डाॅ.दिलीप पुंडे हे एक आगळ वेगळ व्यक्तीमत्व आहे.मुखेडवासीयांशी त्यांची बाॅण्डींगही अभुतपुर्व आहे.त्यांच्या दांडग्या जनसंपर्काची प्रचीती व्याख्यानमालेच्या हजारो श्रौत्यांच्या उपस्थीतीतून जाणवते
कोरोनामुळे एक वर्ष होवू शकली नाही ती व्याख्यानमाला पुन्हा सुरु होत आहे याचा आनंद मुखेडकरांना झाला.आज तर भाग्यश्री चा सन्मान आणि इंद्रजीत देशमुखांचे पसायदान हे दोन्ही कार्यक्रम अप्रतीम झाले.
डाॅं.दिलीप पुंडे व त्यांचे कूंटूबीय आणि मीत्र परीवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
—-
आ.दिलीपजी कोडगिरे
कांग्रेस प्रवक्ता नांदेड
9423440864
आदरणीय दिलीपजी पुंडे साहेब
आपल्या मोहनावतीनगरीची संस्कृती समृद्ध करण्यात आपल्या व्याख्यानमालेचा वाटा निश्चितच मोठा आहे.याबरोबरच आपल्या प्रेरणेनं या नगरात अनेक सामाजिक चळवळी, सांस्कृतिक, वैद्यकीय,सांगीतिक कार्यक्रम आकाराला आले.एक द्रष्टा माणूस काय काय करू शकतो,याचं आपण उदाहरण आहात.असं लिहिलेलं कदाचित आपल्याला आवडणार नाही पण ही वस्तुस्थिती आहे.असो.
_शिवाजी आंबुलगेकर
सहशिक्षक,
विद्यानिकेतन काळेवाडी.
मनोगत …….
संत ज्ञानेश्वर माऊलींनी वसुधैव कुटुंबकम शेकडो वर्षांपूर्वी प्रसाद रुपी पसायदानातून मागितले बऱ्याच शब्दाचा अर्थ आम्हाला त्यांच्या व्याख्यानातून कळाले स्वर्गीय भिमाई व्याख्यानमाला मध्ये स्वर्गीय गुरुवर्य पांडुरंग पुंडे स्मृती पुरस्काराची निवड व विषय तर योग्य पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड केलेली आहे अकरावे पुष्प गुंफताना भूमी कन्या भाग्यश्री जाधव यांचा सन्मान करून सर्वांना आनंदी केले आहे ..
म्हणतात ना…घरचा माहेरचा सन्मान सर्व सन्मानापेक्षा सर्वश्रेष्ठ असतो
आम्ही सर्व श्रोते डॉक्टर पुंडे साहेबांचे व कुटुंबीयांचे कृतज्ञ व आभारी आहोत
एक श्रोता
ज्येष्ठ धन्वंतरी डॉ आर जी स्वामी
स्वामी हॉस्पिटल मुखेड जिल्हा नांदेड
मातोश्री भिमाई व्याख्यानमाला नक्कीच येणाऱ्या पिढीसाठी फलदायी आहे
. ही व्याख्यानमाला अशीच उत्तुंग भरारी घेत दीर्घायुषी होत जावो हीच सदिच्छा…सर,आम्हाला आपला अभिमान आहे*..चार लोकांना घरी जेवणासाठी बोलवायचे असेल तर अख्खे कुटुंब ते नियोजन करण्यात व्यस्त होते.तरीही कुठेतरी काहीतरी राहून च जाते..ही इतकी मोठी व्याख्यानमाला आपण दरवर्षी आयोजित करता.त्यासाठी लागणारे खूप मोठे नियोजन, आर्थिक बाबी, अनेक अडचणी आणि त्यावर तोडगा काढणे हे सर्व फक्त आपल्याला करावे लागते.आणि मी तर म्हणतो की हे फक्त आपणच करू शकता.ज्याने शक्य होते, देव त्यालाच ते कार्य देतो हे अगदी तंतोतंत लागू होते सर..ही व्याख्यानमाला मुखेड साठी भूषणावह आहे..
🙏🏻🙏🏻
डॉ. लतिफ मुजावर
सावरगाव (पी)
9420200786
आदरणीय डाॅ. दिलीप पुंडे सर. मुखेड
आपण मुखेडातल्या विविध सामाजिक चळवळींचे प्रणेते म्हटल्यास वावगं वाटण्याचं कारण नाही. खरे तर आपण आपली वैद्यकीय सेवा सांभाळून समाज भानावर यावा म्हणून धडपडत असता. विविध चळवळीना प्रेरणा देत आपल्या मार्फत चालवल्या जाणार्या ‘मातोश्री भीमाई व्याख्यान मालेचं’ हे तपपूर्तीचं वर्ष . एकादशी व्रतानं वारकर्यास जे समाधान मिळतं तितकं व्याख्यानमालेचं अकरावं पुष्प उद्बोधक ठरलं आहे. मा. इंद्रजित देशमुख सरांनी पसायदानाचा खुपच व्यापक अर्थ श्रोत्यांपुडे मांडून सर्वांना आंतर्मुख केलं आहे.. गुरूवर्य कै. पांडुरंगराव पुंडे स्मृती पुरस्काराने पॅरा ऑलिम्पिक खेळाडू मुखेडची लेक भाग्यश्री जाधवचा सन्मान व दाखवण्यात आलेली तिची दृक-श्राव्य संघर्ष कहाणी खुपच भावस्पर्शी होती
दिवसेंदिवस ‘मातोश्री भीमाई व्याख्यानमाला ‘ खुपच उठावदार नजाकतीनं भरारी घेत आहे.
ही मुखेडकरांसाठी खुपच मोठी पर्वणी ठरते आहे. पुढील कार्यासाठी मनस्वी सदिच्छा….
-एकनाथ डुमणे
व मायबोली परिवार, मुखेड