
दैनिक चालु वार्ता अहमदपूर तालुका प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर:- कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज मुख्य सभागृह येथे धम्म चैरिटेबल ट्रस्ट च्या वतीने दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता पाचवे धम्मविचार साहित्य व संस्कृती सम्मेलन व राज्यस्तरीय “क्रांतिज्योती सावित्रीमाई पुरस्कार 2023” वितरण सोहळा त्याचबरोबर तिसरे सत्रात कवी सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सम्मेलन अध्यक्ष म्हणून जेष्ठ साहित्यिक व पत्रकार मा.संजय आवटे,सुप्रसिद्ध कवयित्रि मा.दिशा पिंकी शेख, सुप्रसिद्ध कवी व लेखक माजी संमेलनाध्यक्ष मा.डाॅ.सतीशकुमार पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून धम्म अभ्यासक मा.विजया काबंळे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अँड. मंचकराव ढोणे,तसेच कोल्हापुर चे माजी महापौर मा.डाॅ.नंदकुमार गोंधळी, निमंत्रक अँड.करुणा विमल ईत्यादी प्रमुख अतिथीच्यां हस्ते “क्रांतिज्योती सावित्रीमाई2023” या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी महाराष्ट्रातुन आलेल्या 2000 प्रस्तावपैकी समितीने निवड करण्यात आलेल्या 58 मान्यवरांना या भव्य आणि दिव्य डोळे दिपुन टाकणारा अशा कार्यक्रमात “राज्यस्तरीय क्रांतिज्योति सावित्रीमाई 2023” पुरस्कार देऊन गौरव सन्मानित करण्यात आले.त्यात अहमदपुर (लातुर) येथुन 5 व्या क्रमांकावर निवड झालेले डाॅ.संजय वाघंबर यांना वरील मान्यवरांच्या हस्ते “राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीमाई पुरस्कार 2023” देऊन गौरव व सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातुन खुप मोठया संख्येने मान्यवंर आपले नातेवाईक व मित्र परिवारासहित उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमाचे नियोजनचे कार्य निर्मिती विचारमंच कोल्हापूर चे अध्यक्ष आयु.अनिल म्हमाने व त्याचबरोबर संयोजन समिती डाॅ.दयानंद ठाणेकर,सुरेश केसरकर,प्रॉ.डाॅ . शोभा चाळके,तात्यासाहेब कांबळे,विमल पोखर्णीकर,सिध्दार्थ कांबळे,सनी गोंधळी,अनुष्का माने,अर्हंत मिणचेकर यांनी पार पाडले.