
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा..उपवासासाठी रताळे खावी म्हणून रताळे म्हणजे (स्वीट पोटॅटो )” घेतली जातात.
पण आपल्याला वाटते
रताळे बटाट्यासारखी मग विचार येतो की, वजन वाढायचे आणि आपण चटकन हात मागे घेतो पण हीच आपली मोठी चूक आहे. कारण रताळे वजन वाढवित नाही तर वजन कमी
करतात. रताळे आपण रोज खात..नसलो तरी बाजारात ती उपलब्ध आहेत. बऱ्याच जणांना रताळ्यांचा डाएटमध्ये वापर केल्याचे होणारे फायदे माहीत नाहीत.
रताळेमध्ये बीटा कॅरोटिन
आढळून येते. रताळ्यांचे सेवन
केल्याने तुमच्या डोळ्यांना बीटा कॅरोटिन म्हणजेच व्हिटॅमिन ‘ए’ मिळेल. रताळे कॉर्डेयोप्रोक्टिव गुणधर्म आहे. जो होणाऱ्या किंवा होण्याची शक्यता असलेल्या हृदयरोगापासून दूर ठेवण्यास मदत करतो. हल्लीच्या बदलत्या
जीवनशैलीमुळे, वाढत्या कामाच्या तणावामुळे बहुतांश लोकांना हृदयरोग होतो. अगदी कमी वय असलेल्या मुलांमध्येही
हृदयरोग होण्याची संख्या वाढू लागली आहे. यासाठी रताळी फायदेशीर ठरते. शरीरात असे काही पदार्थ तयार होतात जे शरीरातून बाहेर पडणे अत्यावश्यक आहे. शरीराची डिटॉक्सिफाईड होणे खूप गरजेचे असत. अशावेळी शरीरातील नको ते घटक बाहेर काढून शरीराला साफ ठेवण्यासाठी रताळ हे अतिशय उपयोगी ठरते. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रताळ हे खूपच उपयुक्त मानले जाते.