
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी –आकाश माने
. स्वातंत्र्याच्या आमृतमहोत्सवी फ्रेंड्स फुटबॉल क्लब यांच्या तर्फे दिनांक 25/1/2023 ते 29/1/2023 या पाच दिवशी प्रजासत्ताक चषक राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन आझाद मैदानावर करण्यात आले होते. यात महाराष्ट्राच्या नामवंत 16 संघांनी यात भाग घेतला. या स्पर्धेमध्ये मुंबई संघाने जालना संघाला अंतिम फेरीत 1-0 असा पराभव करून अजिंक्यपद पटकावले.
या स्पर्धेचे पाहिले पारितोषिक 71000 रुपये रोख आणि चषक मेटारोल स्टील कंपनी चे डॉक्टर जुगलकिशोर जी भाला यांच्या तर्फे देण्यात आले. द्वितीय पारितोषिक 51000 रुपये रोख आणि चषक पै. आमोल धानुरे यांच्या वतीने देण्यात आले.
व्यक्तीक पारितोषिक मध्ये बेस्ट कीपर 5000 रुपये रोख आणि चषक राजेश निर्मल यांनी दिले तसेच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट 5000 रुपये रोख आणि चषक पै. विपुल कांबळे यांच्या तर्फे तर बेस्ट स्कोअरर 5000 रुपये रोख आणि चषक सुमित कुमार यांनी दिले.
या बक्षीस वितरण समारंभासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास गोरण्ट्याल, डॉक्टर जुगलकिशोर भाला ,भास्कर दानवे, अमोल धानुरे हे होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर बळीराम बागल, आश्विन दादा अंबेकर, डॉक्टर प्रदीप हुशे, महविर ढक्का, जगदीश भरतिया, दिनेश भगत, निखिल पगारे, नंदकिशोर गरदास, विनोद भगत, रमेश गौरक्षक, दत्ता पाटील, सुभाष भुजंग, मिर्जा अन्वर बेग, डॉक्टर निशिकांत लोखंडे, डॉक्टर किशोर बीरकायलू, मुकेश बीरकायलु हे होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फ्रेंड्स फुटबॉल क्लब चे पदाधिकारी कन्हैय्यालाल भूरेवाल, राजेश निर्मल, सचिन जैस्वाल, अजय नीलवंत, नितीन लोखंडे, सुनील हस्तक, मिलिंद इंगळे, शुभम शिरसगार, अमित कांबळे, सदानंद निर्मल, निलेश वाघमारे, इम्रान सिद्दिकी, अली परसुवाले, आशिष हतागाले, प्रवीण निर्मल, सैय्याद फुरकान, अर्जुन राशनकर यांनी परिश्रम घेतले.