
दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनीधी -समीर मुल्ला
तालुक्यातील हासेगाव (के) येथिल विद्युत पुरवठा गावातील सबस्टेशन जोडलेले आहेत. यामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असून गावाला कळंब सबस्टेशन जोडण्यात यावे या मागणीचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आहे.
कळंब तालुक्यातील हासेगाव (के.) गावामधील विद्युत पुरवठा हासेगाव (के.) सबस्टेशन जोडलेली आहे. परंतु त्या हासेगाव (के.) सबस्टेशन कसलीच चालत नसल्यामुळे शेतातील पिकांना पाणी देण्याची अडचण निर्माण होत आहे, यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पुर्वीप्रमाणे कळंब येथील सबस्टेशन १५ ट्रान्सफार्मर जोडण्यात यावे. खंडित विजपुरवठ्याच्या त्रासापासुन सर्व शेतकऱ्यांना मुक्त करावे, तसेच विद्युत पुरवठा हा पूर्वीप्रमाणे दररोज ८ तास देण्यात यावा. आठ दिवसांच्या आत विजपुरवठा सुरुळीत न करून दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना व
शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.
अशा मागणीचे निवेदण देण्यात आले आहे. या निवेदनावर महाराष्ट्र नवनिमार्ण सेना उपजिल्हाध्यक्ष प्रभाकर लिंबराज धुमाळ, ग्रामपंचायत सदस्य रामलिंग धुमाळ, लक्ष्मण भिसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.