
दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी -सुरेश ज्ञा.दवणे
जालना (मंठा )
दि.2 ऑक्टोंबर 25 रोजी तालुक्यातील नायगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आणि स्वच्छता ही सेवा अभियानाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण हे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.त्याप्रसंगी स्वच्छता अभियान अनुषंगाने ग्रामपंचायत परिसर स्वच्छ करण्यात आला.याप्रसंगी बोलताना मा.सरपंच अविनाश राठोड यांनी सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी,भारतरत्न लालबहादूर शास्त्री,संत गाडगेबाबा आणि संत तुकडोजी महाराज यांना त्रिवार अभिवादन करून केले.महाराष्ट्र सरकारने 01 ऑक्टोंबर हे जागतिक जेष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे ठरविले होते. या आव्हानाचा स्वीकार करून सरपंच श्रीमती चंद्रकला सूर्यवंशी यांच्या सूचनेप्रमाणे आज ग्रामपंचायत कडून ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.सत्कार मध्ये रूपा नाईक राठोड,खुशाल राठोड,नारायण फुपाटे,शेषराव राठोड,बळीराम खंदारे,श्रीराम पवार,रामभाऊ सानप,वसंत राठोड, कांताबाई राठोड आणि श्रीमती सुमनबाई फुपाटे इतरांचा सहभाग होता.
राठोड यांनी पुढे बोलताना ज्येष्ठ नागरिकाला विनंती केली की आपण आपल्या गावामध्ये “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” राबवत आहोत त्या अभियानाच्या अनुषंगाने आपल्या गावाचा शाश्वत विकास,समृद्ध आणि आदर्श गाव कसे निर्माण झाले पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती केली.
आपण सर्व सोबत राहून गावाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करूया आणि भविष्यामध्ये आपले गाव स्मार्ट व्हिलेज कसे झाले पाहिजे त्यासाठी प्रयत्न करूयात, नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये मोफत रोग निदान शिबिर आणि जालना जिल्ह्याच्या कलेक्टर अशिमा मित्तल यांचा आवडता विषय “चिया” उत्पन्नासाठी शेतकरी गटाचे शिबिराच्या आयोजन करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.
शेवटी त्यांनी आलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिक आणि गावकऱ्यांचे अभिनंदन व आभार मानले.
या कार्यक्रमात प्रसंगी ग्रामपंचायत चे ग्रामपंचायत अधिकारी बी.एस गवळी,उपसरपंच नामदेव फुपाटे, गौतम दहिजे,श्रीहरी मगर,अनिल राठोड,यशोदाबाई अंभोरे,सुमित्रा फुपाटे ई.सदस्य आणि लखन राठोड,महेश देशमुख,आबासाहेब वाव्हळे,संतोष रिठाड,भारत फुपाटे ई गावकरी उपस्थित होते.