
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड/हिंदोळा :- मौजे हिंदोळा ता.लोहा जि.नांदेड येथे गुरुकृपे करून फाल्गुन शुद्ध १४ सोमवार ६/३/२०२३ ते फाल्गुन वद्य ६ सोमवार दिनांक १३/३/२०२३ पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होणार आहे आणि दिनांक १३/३/२०२३ रोजी सोमवार सकाळी ७ ते ९ या शुभमुहूर्तावर श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व मंदिर कलशारोहण सोहळा संपन्न होणार आहे. दैनंदिन कार्यक्रम सकाळी ४ ते ६ काकडा आरती ६ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण १० ते १२ गाथा भजन सायंकाळी ४ ते ६ हरिपाठ आणि रात्री ८ ते १० हरी किर्तन, दिनांक ११/०३/२०२३ शनिवार ह.भ.प. बालाजी महाराज गुडेवार सिडको नांदेड १२/३/२०२३ रविवार ह.भ.प. चंद्रकांत महाराज लाठकर दिनांक १३/३/२०२३ सोमवार सकाळी ९ ते११ काल्याचे किर्तन होईल.ह.भ.प. मधुसूदन महाराज भक्त आश्रम हिंदोळा /करमाळा कलशारोहण कार्यक्रमानिमित्त प्रमुख उपस्थिती श्री श्री १०८ यदुबन महाराज मठ संस्थान कोलंबी ,श्री संत देवगिरी महाराज कापसी गुंफा श्री.श्री. १००८श्री मंहत स्वामी प्रयागगिरी महाराज प्रयागराज आश्रम डोलारा, श्री ह.भ.प. मधुसूदन महाराज हिंदोळा /करमाळा,श्री. सुभाष महाराज बिराजदार तुळजापूरकर महादेव मंदिर हिंदोळा सर्व भाविक भक्तांनी पूर्णवेळ सप्ताहासाठी यावे तसेच काल्याचे किर्तनानतंर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे असे समस्त गावकरी मंडळी हिंदोळा ता. लोहा जि. नांदेड यांनी कळविले आहे.