
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी – शिवकुमार बिरादार
मुखेड दि. १०/जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड आदरणीय डॉ निळकंठ भोसीकर सर, वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय, मुखेड डॉ किशोर कदम सर, वैद्यकीय अधिकारी डॉ सुधाकर तहाडे सर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ रमेश गवाले सर यांच्या उपस्थितीत *मोफत अंडवृध्दी शस्त्रक्रिया शिबिर* संपन्न झाले.
शिबिरात एकूण १३ हायड्रोसिल व ०५ हर्निया शस्त्रक्रिया उपजिल्हा रुग्णालयचे सर्जन डॉ गोपाळ शिंदे सर, डॉ संभाजी कदम सर व भूलतज्ज्ञ डॉ अर्चना पवार मॅडम यांनी यशस्वीरीत्या पार पाडल्या. यावेळी त्यांना श्रीमती पद्मा पांचाळ सिस्टर, श्रीमती मनीषा पुंडे सिस्टर, श्री योगेश पवार ब्रदर, श्रीमती बीजला फत्तेलष्कर सिस्टर, श्री बाबू चल्लावाड, श्री संतोष नरोटे, श्री माऊली, श्री लखन पवार, श्री माचनवाड व सर्व अधिकारी/कर्मचारी उपजिल्हा रुग्णालय मुखेड व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय मुखेड यांचे सहकार्य लाभले.
तसेच आज एका गर्भवती महिलेचे सिझर (LSCS) ऑपरेशन स्त्रीरोगतज्ञ डॉ शोभा देवकते मॅडम व डॉ तानाजी लवटे सर यांनी यशस्वी पार पाडले.