
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी-बालाजी देशमुख
बीड–जिल्ह्यातील व्यसनमुक्ती केंद्राच्या नावाखाली रुग्णांची फसवेगिरी सुरु आहे.याबाबत अनेक दिवसांपासून कुणकुण सुरू होती. परंतु तक्रार करण्यासाठी
कोणी पुढे येत नव्हते. अंबाजोगाई तालुक्यातील प्रकार चव्हाट्यावर आलाआणि याला तोंड फुटले. याची दखल घेऊन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश
साबळे यांनी बीड, अंबाजोगाई, केज येथील नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रांवर छापे मारले आहेत. यातून मोठी बोगसगिरी उघड होणार? अशी जोरदार चर्च जिल्हाभर सुरु आहे.व्यसनाधीनता मुळे बेजार असलेले कुटुंब व्यसन सुटावा म्हणून मोठ्या अपेक्षेने व्यसनमुक्ती केंद्रात येत असे. याचाच फायदा उचलत ही केंद्र केवळ त्यांना लुटण्याचा धंदा करत होते का? असे आजच्या कारवाईतून दिसून येत आहे.. याबाबत कोणीही तक्रार करण्यासाठी पुढे येत नसल्याने यांचे फावत होते. परंतु अंबाजोगाई येथील व्यसनमुक्ती केंद्रात डॉक्टर असलेल्या महिलेने अनेक धक्कादायक खुलासे केल्याने याप्रकरणी तक्रार केल्याने अंबाजोगाई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची दखल घेत आज जिल्हा शल्यचिकित्सकडॉ. सुरेश साबळे व पोलीस प्रशासनाने बीड शहरातील नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र तसेच केज, अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा, मोरेवाडी येथील व्यसनमुक्ती केंद्राची झडती घेतली. यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असल्याचे बोलले जात आहे. तसेच बीड येथील केंद्रामध्ये मागील ४ ते ५ दिवसांपासून डॉक्टर फिरकले नसल्याचे समोर आले. एक्सपायर झालेली औषधे सापडली आहेत. येथील रुग्णांची सुटका ही करण्यात आली आहे. याबाबत प्रशासनाकडून खुलासा करण्यात आल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. या कारवाईचे जिल्हाभरात कौतुक करण्यात येत आआहे गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी बीड जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे व शहराध्यक्ष गोविंद मस्के या प्रकरणात सतत आवाज उठवत होते.