
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे.
मंठा तालुक्यात मागील वर्षी कापसाला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांची कापुस लागवडीचे क्षेत्र वाढविले. परंतु, यावर्षी आता कापसाला मागीलवर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात भाव घसरले आहेत. शिवाय भाव वाढेल या आशेपोटी शेतकऱ्यांनी कापुस घरातच साठऊन ठेवला. त्यामुळे कापसाला कीड लागण्याचे प्रकार वाढले आहे. कापुस जुना होत असल्याने बारदाण्यात भरतांना अंगाला खाज सुटत आहे. या कारणास्तव मजुर कापुस भरण्यासाठी येत नाही. उन्हाळा लागल्याने उष्णता वाढत चालली आहे. अशावेळी आग लागण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे कापुस घरात ठेवणे धोकादायक झाले आहे.
पारंपारीक पिकाला फाटा देत शेतकऱ्यांनी मंठा तालुक्यात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. यावर्षी कापसाला ८ हजार प्रति क्विंटल भाव मिळत आहे. गेल्यार्षीच्या तुलनेत ४ हजारांनी भाव घसरले आहेत. याच हंगामात मागीलवर्षी कापसाला १२ हजार रूपये भाव मिळाला होता. यावर्षी घरात कापसाची साठवणुक करूनही कमी प्रमाणात भाव मिळत आहे. कापसाचे वजनही घटत आहे. शिवाय रोगराईचा धोका असुन आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव कापुस उत्पादक शेतकरी तोटा सहन करून व्यापाऱ्याला कापुस विक्री करत आहेत.कापुस वेचणीसाठी आलेले मजुर शेतकऱ्यांच्या घरी हेलपाटे मारत आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.