
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर – बिलोली सीमा लगत असलेल्या भागातील सर्व रेती घाटातून अवैधरित्या उत्खनन करण्यात येणाऱ्या रेती वाहतुकीवर तालुका प्रशासनाने बंदी घातली असल्याने गेल्या आठ ते दहा दिवसापासून रेतीमाफीयांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभेत रेती विषयी प्रश्न मांडला असल्याने महाराष्ट्रातील सर्व रेती घाटाचे पूर्ण टेंडर बंद करून तेलंगाना व आंध्र प्रदेशातील मॉडेल प्रमाणे रेती विक्री करण्यात येईल असा निर्णय शासनस्तरावर घेण्यात येणार
असल्याचे दिसून येत आहे. देगलूर शहरात गेल्या आठ दिवसापासून रेती बंद आहे. या आधी अवैध पद्धतीने रेती उत्खनन रेती विक्री व रेतीची तस्करी ही नित्यनियमाने सुरूच होती. या अवैध विक्रीमुळे गरजू व सर्व सामान्य नागरिकांना रेती मिळविण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागत होता. तसेच आता मात्र घरकुल योजना साठी रेती मिळत नसल्याने, सर्व सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात कामं रखडले गेले आहेत. तर देगलूर येथील रेती माफिया हे येथील राजकीय व्यक्ती तसेच प्रशासनातील बडे अधिकारी यांना हाताशी धरून रेतीचा काळाबाजार नेहमीच करीत असत परंतु, येणाऱ्याकाळात महाराष्ट्र शासनाने रेतीवर निर्बंध लादल्यास या रेती माफियांची मुजोरीगिरी नक्कीच थांबणार असल्याचे दिसून येते
विधानसभेत माजी मुख्यमंत्र्यांनी रेतीच्या अवैध उत्खनन तथा तस्करी विरुद्ध प्रश्न जरी मांडला असला तरीही देगलूर – बिलोली विधानसभा संघात या भागात मात्र अवैध रेती विक्री अवैध रेती साठा हा ठरलेलाच होता कारण येथील राजकीय नेते व प्रशासकीय अधिकारी यास पाठिंबा देत होते. गेल्या अनेक दिवसापासून अवैध रेती वाहतुकीवर देगलूर महसुल प्रशासनाने नेहमीच कार्यवाही केलेली आहे परंतु या कार्यवाहीमध्ये जाणून बुजून एका विशिष्ट समाजाला दोषी धरण्यात आल्याने या अवैध रेती वाहतुकीवर प्रशासन प्रस्थापितांना अभय देत असल्याचेही दिसून आले . एकूणच देगलूर शहरांमध्ये रेती शिवाय अनेक अवैध धंदे नित्यनियमाने सुरूच आहेत यामध्ये शहरासह संपूर्ण तालुक्यात मटका, जुगार, अवैध हे चालुच वाहतूक आहे. मटका व अवैधवाहतुकीने तर कळस गाठला आहे. तालुक्यातील व परिसरातील अनेक नागरिक हे शहराच्या ठिकाणी बाजारहाट करण्यासाठी खाजगी वाहतुकीने मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असतात. यावर पोलीस प्रशासनाचे काहीच निबंध राहिलेले नाही. येणाऱ्या काळात लग्न समारंभाचे दिवस सुरु होणार आहेत अशावेळी येथील पोलीस प्रशासनाने अशा अवैध वाहतुकीकडे लक्ष दिल्यास भविष्यातील होणान्या अपघातावर नियंत्रण मिळेल. देगलूर शहरातून नांदेड , नरसी व तालुक्यातील शहापूर, करडखेड, मरखेल, हणेगाव व खानापूरसह दररोज अवैध वाहतुक होत असते. दररोज हजारो ऑटो, जीप, ट्रॅक्टर या माध्यमातून वाहतूक सुरूच असुन प्रवासी वाहतूक होते. पोलीस प्रशासन मात्र डोळ्यावर पट्टी लावून या वाहतुकीकडे दुर्लक्ष करीत असल्याने या समस्येकडे समधीत महसूल विभागाच्या अधिकारी व तसेच आमदार साहेब लक्ष देतील काय असा प्रश्न देगलूर येथील जनतेला पडलेला आहे.