
दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी -दीपक कटकोजवार
चंद्रपूरकरांचे आराध्य दैवत माता महाकाली यात्रा 27 मार्चपासून सुरू होत आहे. संपूर्ण विदर्भातील भक्तांसह मराठवाडा, तेलंगाणा व आंध्र प्रदेशातील भक्त मोठया श्रद्धेने जागृत देवस्थान म्हणून माता महाकाली चे दर्शन घेण्यासाठी यात्रेत येतात.
या यात्रेच्या काळात भक्त – भाविक दुरदुरुन भक्त बस, टेम्पो व आपल्या वाहनाने या ठिकाणी येतात त्यामुळे फार मोठया प्रमाणात गर्दी जमते.
भाविकांची योग्य व्यवस्था, सोयी व वाहतुकीच्या दृष्टीने जिल्हा व महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
या अनुषंगानें अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सर्व संबंधित यंत्रणा व महाकाली देवस्थान विश्वस्त मंडळाची आढावा बैठक घेतली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, उपविभागीय पोलिस अधिकारी एस.पी.नंदनवार, पोलिस निरीक्षक सतिशसिंह राजपूत, वाहतुक विभागाचे पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील, मनपाचे उपायुक्त अशोक गराटे, अन्न व औषध विभागाचे नितीन मोहिते, वेकोलीचे व्यवस्थापक आर. के. सिंग, महाकाली देवस्थानचे विश्वस्त सुनील महाकाले उपस्थित होते.