
दैनिक चालु वार्ता अहमद्पुर प्रतिनिधी-विष्णु मोहन पोले.
लातूर.अहमद्पुर: तालुक्यातील मान्याड च्या खोऱ्यात वसलेले माळा च्या टेकडीवर वसलेलं गाव सुमठाणा येथील बहुतांश लोकांचा व्यवसाय शेती आणी पशुपालन ,बरेच तरुण कामासाठी पुणे,मुंबई,इतर शहरात वास्तव्यास असतात पण त्यांना एकत्र आणून हरीनामाच्या गजरात स्वतःला समर्पित करण्याचा वर्षातून एकदा येणारा उत्सव म्हणजे अखंड हरीनाम सप्ताह. 1976साली काही तरुणांच्या मनात विचार आला आपल्या शेजारच्या गावामध्ये हरिपाठ होत,सप्तेह होतात आणी आपल गाव मास,मटणातच गुंग आहे.आपल्या गावात पण सप्ताह झाला पाहिजे असा त्यांनी मनोमन विचार केला,बापूराव मुसळे वारकरी,शेख इब्राहिम साहेब,देविदास पोले पाटील,कै.पुंडलिक महाराज,कै.संजयरावं पोले,कै गोविंदराव पोले, भगवान पोले,माधवराव मुसळे,शिवदास हमने,इतर त्यांचे सर्व सहकारी आणी गावकरी.यात सर्वात खूप मोठा सहभाग आणी योगदान आपल्या गावात। सप्ताह व्हावा या साठी धर्मान मुस्लिम असणाऱ्या इब्राहिम शेख यांचं आहे अस गावातील जुनी जाणती मंडळी सांगतात.संत मोतीराम महाराम ,मारोती महाराज,सोपान काका इसादकर,महादेव बाबा मोळवण, त्याच संत परंपरेतील सध्या विजयानंद सुपेकर महाराज यांच्या आशीर्वादाने या गावातील युवकांनी सुरु केलीली 46 वर्षांपासूनची परंपरा या गावाने कायम ठेवली आहे. आणी .गावातील हनुमान मंदिरात ह्या सप्ताह च आयोजन असत .पहिल मंदिरावर पतर होती आता स्लॅप आला पण अखंड हरीनामाचा पाठ काही विसरलं नाही या बदलत्या काळात पण येथील युवक,महिला,बालगोपाल कायम आपल कर्तव्य समजून आपल्या या सप्ताह निमित्त येऊन संस्कृती जोपासतात त्या बद्दल त्यांचं कौतुकच. नवीन पिढीने मागील पिढीचा आदर्श आणी मार्गदर्शन घेत अखंड हरीनाम सप्ताह बरोबरच श्री मद भागवत कथा ज्ञान यज्ञाच आयोजन केल आणी ते अनेक वर्षांपासून चालु आहे. आपल्या गावातील संस्कृती जपतात हे त्यांचं कौतुक .दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरात विना उभाराहीला आणी अखंड हरीनामाचा गजर चालु झाला सर्व सप्ताह पारायण,तुकाराम गाथा वाचन,प्रवचन भागवत कथा,हरिपाठ,हरिकीर्तन ,हरिजगर,काकडा इत्यादी सर्व प्रत्येक दिवशी असत.या गावाला अन्न दानाची खूप मोठी परंपरा आहे.सकाळी ,संध्याकाळी,वेगवेगळी अन्नदाते आपल अन्नदानाच कार्य खूप आवडीने करतात.या वर्षी श्रीमद भागवत कथा सांगणारे भागवताचार्य ह.भ.प.श्री.नारायण महाराज पालमकर,तर इतर दारदिवशीची कीर्तने हभप.बाबू महाराज सुमठणकर,हभप भागवत महाराज पडेगावकर,हभप प्रभू महाराज मरगळवाडीकर,हभप शंकर महाराज स्वामी घटग्रेकर,राजेंद्र महाराज बोन्धले पंढरपूर,हभप ज्ञानोबा माऊली शंकरवाडी,हभप विलास महाराज गेजगे बोथी,हभप कतारे महाराज पालम,मारोती महाराज चितळी हिपरगा,भरत महाराज परळी,ह.भ.प विजयानंद सुपेकर महाराज आणी ज्ञानोबा माऊली मुडेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताह ची सांगता होणार आहे,सुप्रसिद्ध गायक,वादक आणी कीर्तनकार,भजनी मंडळी यांचं येथे योगदान असत त्यामुळे पंचक्रोशीतील आणी तालुक्यातील सर्व भक्त गणांना या सर्व ज्ञान रुपी अमृतांचा लाभ घेण्यासाठी सर्व गावकर्याच्या वतीने उपस्तिथ राहाण्याचे आवाहन तथा विनंती केली आहे