
दैनिक चालु वार्ता चिखलदरा तालुका प्रतिनिधी- प्रवीण मुंडे
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकरी समृद्ध योजना संपूर्ण मेळघाटात राबवण्यातत येत आहे शेतकऱ्याने समृद्ध व्हावे त्यासाठी शासन विविध् योजनेची अंमलबजावणी करून मेळघाटात राबवत आहे गुरांचा गोठा सिंचन विहीर शेळी शेड १यूनीट
दोन युनिट तीन युनिटअसे सेट शासनाकडून मनरेगा अंतर्गत दिले जातात मात्र या योजनेतील संपूर्ण कागदोपत्री प्रक्रिया पार पाळण्यासाठी
शेतकऱ्याकडून दहा हजाराची गुपित मागणी करण्यात आली आहे असा आरोप चिखली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पाटकहु गावातील लाभार्थीने तेथील मनरेगा अधिकाऱ्यावर केलाआहे
बिल काढण्यासाठी लाभार्थ्याजवळून 10000 घेऊन एक वर्ष होऊन सुद्धा बिल काढला नाही अशी तक्रार पाटकहु गावातील शेतकरी प्रेमलाल मेटकर व सिताराम कस्तुरे यांनी चिखलदऱ्याचे गटविकास अधिकारी जयन्त बाबरे यांना तक्रार करण्यात आली आहे व दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाहीची माग केली