
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा तालुक्यातील पेवा येथील रहिवाशी दिपक सोनूनकर यांच्या गेल्या महिन्यात ढोकसाळ येथील दुकानास शॉटसर्कीटमुळे आग लागून यांचे सलुन दुकान पुर्ण जळाले सर्व सलुन साहित्य चेअर , फर्निचर, ग्लास आदीचे नुकसान झाले असता त्यांना मदत म्हणून आजीनाथ( अजय )दळे जालना जि. कार्याध्यक्ष बारा बलुतेदार यांनी दोन चेअर भेट दिल्या यावेळी त्यांच्या सोबत जनार्धन निकरट नाभीक म. मं.घनसावंगी ता.अ.,भागवत शिंदे, उद्धवराव राऊत, बाळासाहेब दळे, गंगाराम बिडवे, संजय वाघमारे हेलसकर , जनार्दन सोननकर व समाज बांधव उपस्थित होते.