
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड:-नांदेड जिल्हा मराठा सेवा संघाच्या चळवळीतून तयार झालेले पंडित पवळे व अरुणा पवळे यांचा उच्च विद्या विभूषित मुलगा अँड.प्रशांत व न्याय व्यवस्थेत सेवा बजावलेले नारायणराव कदम व शिवमती ललिता कदम यांची उच्च विद्या विभूषित मुलगी अँड.नेहा यांचा ७ मे २०२३ रोजी रविवारी परभणी येथील वरद गार्डन येथे सत्यशोधक शिवविवाह सोहळा संपन्न झाला.शिवसेवक म्हणून मधुकर महाराज बारुळकर व शिवशाहीर अँड.दिगंबर देशमुख तसेच बाळासाहेब यादव यांनी जबाबदारी पार पाडली .सनईच्या सुरात वधू-वराचे विवाह स्थळावर आगमन झाल्यावर राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिमा व छ.शिवरायांच्या पुतळ्याला वंदन करून शिवधर्म गाथा देऊन इवाई भेट घेण्यात आली.स्त्री शक्तीचा सन्मान म्हणून वधूला वराच्या उजव्या बाजूला बसवून बाजूस त्यांच्या माता-पित्यासह मामाला बसविण्यात आले.बसून लग्न लावताना कुठलाही आडपडदा न ठेवता उपस्थितीताना पाहता येईल अशी व्यवस्था करण्यात आली होती .जिजाऊ ब्रिगेडच्या महिलानी सुंदर जिजाऊ वंदना गाऊन शिवपंचके व वधू-वरांना शपथ गृहण केली.आभारा नंतर भारतीय बैठकीत भोजनाचा सर्वांनी आस्वाद घेत विचारांचा वारस आचरणात आणणाऱ्या या शिवविवाह सोहळ्याची सकारात्मक चर्चा रंगली.
खरं पाहता या विवाहाची लग्न पत्रिकाच अत्यंत मोजक्या शब्दात कार्डवजा,लग्नाचं आवतान,विचारांचा वारसा सांगणारी वेरूळ येथील कैलास लेण्यातील ८व्या शतकातील शिल्पचित्र शिवपार्वती विवाह महामानवाचे कृतार्थ सहजीवनाचा फोटो छापण्यात आला. स्वस्तातील या पत्रिकेतील मजकूर सर्वांना विचार करायला लावणारा होता.या लग्न पत्रिकेत शेवटी खास विनंती करण्यात आली होती .कृपया लग्नात पुष्पगुच्छ या वस्तूस्वरूपातील भेटी आणू नयेत.इतःपर इच्छा असल्यास बंद लिफाप्यात नगद पैशाच्या स्वरूपात भेट द्यावी .किंवा रक्कम नांदेड येथील मराठा सेवा संघाच्या मुलीच्या वसतीगृहाच्या बँक खाते क्रमांक देण्यात आला होता.आलेली सारी रक्कम ही वसतीगृहास दिली जाईल अशी विनंती केली होती,तीला चांगला प्रतिसाद मिळाला .नवदेव-नवरीनी शिवदान म्हणून अकरा हजाराचा चेक यावेळी सर्वांच्या साक्षीत दिला.हा सोहळा अनुकरणीय,नाविण्यपुर्ण,समाज परिवर्तन करणारा असाच ठरला आहे .कितीही छोटा माणूस असू द्या स्वतःला झोकून देऊन शांत आणि मृदू भाषेत निस्वार्थपणे आपले कर्तव्य पार पाडत समाज कार्य केल्यास असंख्य माणसे जोडली जातात .याची प्रचिती या विवाह सोहळ्यात आली.या तारखेला निटची परीक्षा ,लग्नाची मोठी तारीख व दुरचा अंतर असून स्वखर्चाने सर्व जाती धर्माची मोठ्या संख्येने वराडी गोळा झाली होती.ज्यांना या विवाह सोहळ्याला अडचणीमुळे येता आले नाही .त्यांनी घरी येऊन आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या आहेत .तीस वर्षापेक्षा अधिक वर्षे सामाजिक चळवळीत काम करीत असल्याचे हे फलीत आहे .
विवाह प्रसंगी वधू-वरांना युगनायक अँड.पुरुषोत्तम खेडेकर व म्हाडाचे राज्याचे सचिव अरुण डोंगरे यांनी शुभेच्छा संदेश पाठविले आहे .तर प्रत्यक्ष नांदेड जि.प.चे माजी सभापती प्रविण पाटील चिखलीकर,युवा नेते सचिन पाटील चिखलीकर,संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेश अध्यक्ष आनंद दादा चोंदे,मा.महापौर जयश्रीताई पावडे,कंधार-लोहा शिवसेनेचे नेते मुक्तेश्वर धोंडगे,शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले,अर्धापूर पं.स.मा.सभापती डाँ.लक्ष्मणराव इंगोले,जि.प.चे पूर्व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव कपाळे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.)रेखाताई काळम(कदम) व पंडितराव कदम(सहकुटूंब),परभणीचे शिक्षणाधिकारी तथा म.से.सं.चे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल भुसारी,पुर्व शिक्षणाधिकारी तथा म.से.सं.चे मा.जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव खुडे,स्वा.रा.ती.वि.चे कार्यकारी अभियंता इंजि.तानाजी हुस्सेकर,नांदेड जिल्हा मराठा सेवा संघाचे आधारवड इंजि.श.रा.पाटील ,दुबई येथून प्रवास करून आलेले अभियंता संघाचे मा.जिल्हा अध्यक्ष इंजि.व्हि.टी.शिंदे ,बार काँन्सिल चे सदस्य अँड.शैलेशभाऊ देशमुख ,नांदेड जिल्हा वकील संघाचे जिल्हा अध्यक्ष अँड.सतिश पुंड,भार्गव करिअर अकँडमीचे संचालक भार्गव राजे, राज्य पुरस्कार प्राप्त कला शिक्षक प्रलोभ कुलकर्णी , नांदेड म.न.पा.इंजि.खुशाल कदम ,जि.प.मा,सदस्य डाँ.विद्या मोरे व डाँ.कालिदास मोरे(सपत्निक),प्रशिध्द ह्दयरोग तज्ज्ञ डाँ.जळबाजी मोरे,कोळी महा संघाचे जिल्हा अध्यक्ष राम मालेवाड,जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश प्रवक्त्या डाँ.भारतीताई मढवई, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते प्रा.संतोष देवराये,पं.स.मा.सदस्या शुभलक्ष्मी व बालाजीराव सुर्यवंशी(सहकुटुंब),मा.नगर सेविका कृष्णाताई मंगनाळे,मराठा सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल बनबरे,म.फुले शिक्षक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व्यंकटराव जाधव(स.),उपशिक्षणाथिकारी बंडू आमदूरकर,सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव टेकाळे दाभडकर, ,भा.ज.पा.युवा कार्यकर्ते तुळशिराम पाटील बंडाळे,सकल मराठा समाज राज्य समन्वयक सुचिता व शाम पाटील वडजे(सहकुटुंब),डाँ.पं.दे.रा.शि.प.चे राज्य महासचिव व्यंकटराव जाधव वडगावकर,संभाजी ब्रिगेडचे नांदेड जिल्हा अध्यक्ष भगवान कदम ,जिजाऊ ब्रिगेच्या जिल्हा अध्यक्षा अरुणाताई जाधव,जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्षा डाँ.विद्या पाटील ,जिजाऊ ब्रिगेडच्या मा.जिल्हाध्यक्षा सुरेखाताई रावणगावकर, म.से.सं.चे जिल्हा अध्यक्ष उध्दवराव सुर्यवंशी,म.से.सं.चे जिल्हा अध्यक्ष नानाराव कल्याणकर,जिल्हा सचिव तथा उत्कृष्ट निवेदक रमेश पवार, सचिव अँड.सतिश जाधव ,जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हादराव दुरपडे,म.से.सं.चे मा.जिल्हाध्यक्ष पंडितराव कदम,म.से.सं.चे मा.अध्यक्ष शामसुंदर शिंदे नायगावकर,जिल्हा कोषाध्यक्ष पी.के.कदम ,राज्य पुरस्कार प्राप्त ंसेवा निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अमिन पठाण,मुख्याध्यापक गुलामनबी शेख,मुख्याध्यापक फजलुल शेख(सहकुटुंब), लोहा तालुका महिला व बाल विकास अधिकारी प्रणय चाटलावार,सरपंच संघटनेचे मा.अध्यक्ष बळीराम पाटील भरकड,जिजाऊ वधू-वर कक्षाचे प्रमुख सुरेश घोरबांड,ग्राम विकास अधिकारी चंपतराव शिंदे,मा.सरपंच नारायणराव कळकेकर,शिक्षक काँग्रेस चे नेते उत्तम क्षीरसागर(सहपरिवार),स्फुट लेखक वि.रा.शिंदे,पुर्णा तालुका डाँक्टर असोसियन चे अध्यक्ष डाँ.गुलाबराव इंगोले,विवेकानंद शिक्षक पतसंस्थेचे मा.चेअरमन विनायक चव्हाण ,जि.प.शिक्षक सहकारी पतपेढीच्या मा.चेआरमन महानंदा कदम ,राजस्थान येथून अँड.विकास मिना,हैद्राबाद येथून प्रवास करून नवोदीत कवी सोनू दरेगावकर,अँड.प्रविण मोरे,अँड.राज कराळे,पायी दिंडी पालखी सोहळा उगम व विकास संशोधक सदाशिव पवळे ,काँग्रेस कार्यकर्ते डाँ.गणेश पवळे ,मा.सरपंच हरिणाम पवळे ,प्रशिध्द मेडिकल व्यावसायिक पुंडलिकराव चौथमल,लोहा तालुका सं.ब्रि.चे अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे ,सं.ब्रि.सल्लागार प्रा.मारोती भोसले,उध्दव ठाकरे गटाचे नांदेड तालुका युवा नेते दत्ता पाटील येवले,सं.ब्रि.महानगर अध्यक्ष सतिश धुमाळ,सं.ब्रि.जिल्हा प्रवक्ता गजानन इंगोले,जिजाऊ ब्रिगेडच्या कविता आगलावे,सुमित्रा वडजकर,वनिता देवसरकर,राणीताई दळवी,मिनाक्षी पाटील ,मुख्याध्यापक प्रल्हाद कराळे,बळीराम फाजगे,गंगाधर मंत्रे,मुख्याध्यापक राजेंद्र कदम,बळवंतराव जाधव कुष्णुरकर,सह सर्वच क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित राहून आशीर्वाद व शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती .ज्यांना वैयक्तिक अडचणीमुळे विवाहास उपस्थित राहता आले नाही त्यांनी घरी येऊन शुभेच्छा दिल्या आहेत .त्यात युवक काँग्रेस चे शहर जिल्हा अध्यक्ष डाँ.विठ्ठल पावडे,संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष संकेत पाटील ,मा.शहराध्यक्ष व्हाईचेअरमन अँड.श्रीनिवास शेजूळे सह अनेकांनी घरी येऊन शुभेच्छा दिल्या आहेत .ही सामाजिक चळवळीतून आपूलकीची नाळ निर्माण करून विचारांचा वारसा कृतीत आणणाऱ्या पवळे -कदम परिवाराच्या विवाह नांदेड व परभणी जिल्ह्यातील मराठा सेवा संघाच्या पदाधिकारी यांनी व्हाँट्सपवरील पत्रिकेवर मोठी गर्दी केली होती.