
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे.
मंठा ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला कमी खर्चात व तत्पर आरोग्य सेवा गावातच मिळावी हा उदांत हेतू शासनाने पुढे ठेवून दहिफळ खंदारे येथे आरोग्य केंद्र दिले. मात्र डॉक्टर व कर्मचारी वेळी अवेळी उपस्थितीमुळे आरोग्यसेवा कोडमडल्याचे दिसून येत आहे दहिफळ येथील आरोग्य केंद्र फक्त शोभेची वास्तू म्हणून बनले आहे असे नागरिकाचे म्हणणे आहे. करोडो रुपये खर्च करून शासनाने दहिफळ येथे आरोग्य केंद्र व कर्मचाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे निवासस्थाने तयार केले मात्र आज घडीला आरोग्य केंद्रात दहा कर्मचारी नियुक्त आहेत त्यापैकी वैद्यकीय अधिकाऱ्यासह सात कर्मचारी गैरहजर होते मात्र पंखे चालु होते.कर्मचाऱ्या अभावी रुग्णसेवा विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 18 गावाचा समावेश आहे. आरोग्य सेवक केंद्रानर्गत असलेल्या गावात महिना महिना भेट देत नाहीत या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाच ते सहा वर्षांपूर्वी सकाळपासून रांगा लागायच्या वेळेवर रुग्णावर उपचार व्हायचे 24 तास आरोग्यसेवा देणारे या केंद्रात रुग्णांना सेवा मिळत असल्याने पाच वर्षांपूर्वी आरोग्य केंद्र अंतर्गत गावातील नव्हे तर इतर गावातील रुग्ण उपचारासाठी येत होते मात्र आता आरोग्य केंद्राची स्थिती बघता या रुग्णालयात कर्मचायचा अभाव आहे. डॉक्टर कर्मचारी आहेत पण वेळेवर वेळेवर हजर नसल्याने रुग्णांना आल्या पावली उपचाराविना परत जावे लागत आहे येथील कर्मचारी कधीही वेळेवर उपस्थित होत नाहीत. कर्मचाऱ्यांना निवासस्थाने असून सुद्धा जालना मंठा गावावरून ये जा करीत आहेत हे केंद्र 24 तास सेवा देणारे असले तरीही चपराशीव्यतिरिक्त कोणताही कर्मचारी येथे रात्रीच्या वेळी दिसून येत नाही रात्री बे रात्री रुग्णाला नेल्यास चपरासी हा खाजगी डॉक्टर कडे जाण्याचा सल्ला देतो अशा या करोड रुपये खर्च करून बनवण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा काय उपयोग तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती असताना जर रुग्णांना वेळेवर उपचार होत नसेल तर लाखो रुपयांची पगाराच्या माध्यमातून उलाढाल कशासाठी या प्राथमिक आरोग्य केंद्राची व्यथा आहे या बाबीकडे राजकीय पुढऱ्याचे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले तरी शासनाने प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन दहिफळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्ण सेवा सुरळीत करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.