
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार:- समता नायक जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त कंधार येथे दि १५ मे रोजी भव्य शोभायात्रा व मिरवणूक काढण्यात येणार आहे तरी तालुक्यातील बसव भक्तांनी मोठया संख्येने
रहाण्याचे आवाहन भाजपा युवा मोर्चा कंधार तालुका अध्यक्ष साईनाथ कोळगिरे यांनी केले आहे.
जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त कंधार येथे भव्य शोभायात्रा व शिवाचार्याचा सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्यास श्री.ष.ब्र.प.पु.१०८ सोमलिंग शिवाचार्य महाराज बिचकुदेकर श्री ष.ब्र.प.पु.१०८ सिध्ददयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर,श्री.ष.ब्र.प.पु.१०८विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर,श्री.ष.ब्र.प.पु.१०८ वेदांताचार्य दिगाबंर शिवाचार्य महाराज वसमतकर यांचा संत्सग सोहळा भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे तरी कंधार तालुक्यातील बसव भक्तांनी मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भाजपा युवा मोर्चा कंधार तालुका अध्यक्ष साईनाथ कोळगिरे यांनी केले आहे