
दैनिक चालु वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : जिल्ह्यातील पाथरी तालुक्यांतर्गतच्या सिमुरगव्हाण, बोरगाव आणि खेडूळा आदी गावांच्या शिवारांमध्ये सतत होणारा बिबट्यांचा वावर अत्यंत जीवघेणा ठरला जात आहे. त्या भागातील प्रत्यक्षदर्शी नागरिक वारंवार आपण बिबट्याला स्वतः बघितल्याचे सांगत आहेत. त्याचे परिसरात फिरतानाचे मोबाईल मध्ये कैद फोटो, त्याच्या पायाचे ठसे दाखवत आहेत. इतकेच नाही तर वारंवार असणाऱ्या
त्याच्या फिरण्याने कधी आणि कुठे हल्ला होईल, यांची भीती बाळगत कधी मानवीय नुकसान होऊ शकेल याची भीती सतत जणू टांगत्या तलवारी सारखी असते. परिणामी दहशतीखाली असलेला शेतकरी बांधव आणि त्यांचे परिवार नेहमीच चिंताग्रस्त असतात. त्याही पेक्षा चिंतनीय बाब म्हणजे वारंवार अनेक पशुधनांवर जीवघेणे हल्ले करुन कित्येक शेतकऱ्यांच्या पशुधनांचे जीव घेतले जातात. ही वस्तू स्थिती नाकारता येत नाही. पर्यायाने आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत असते. तरीही मोकाट बिबट्यांचा कोणताही बंदोबस्त न करता किंवा चिंताग्रस्त शेतकऱ्यांना कोणताही आधार न देता वनाधिकारी केवळ सतर्क राहाण्याचे सल्लेच देतात. त्यांची ही वृत्ती अत्यंत क्लेशदायक अशीच म्हणावी लागेल. आपली, परिवाराची, आपल्याकडील पशुधनाची काळजी घेणे व त्या सर्वांचे जीव वाचविले जाणे, याची भीती मात्र कायम त्या शेतकऱ्यांना राहिली जाणे स्वाभाविक आहे. दरम्यान, मोकाट फिरणारा हाच बिबट्या कधीही हल्ला करु शकेल, या चिंतेने ग्रस्त शेतकरी बांधवांचा जीव सुध्दा महत्वाचा आहे, हे मुळीच नाकारुन चालणारे नाही. वाढत्या महागाईच्या काळात पशुधन विकत घेणे अत्यंत जिकीरीचे झाले आहे. तद्वतच बिबट्याने केलेल्या गंभीर हल्ल्यात आतापर्यंत किती तरी पशुधनाचे नुकसान झाले आहे. अगदी परिवारासारखे संगोपन करुन त्यांचा जीवापाड पशुसंवर्धन करीत असतांना अचानक होणाऱ्या हल्ल्यात डोळ्याने बघवत नाही, अशा गंभीर जखमा करुन अर्धमेले होणाऱ्या पशुंची काय अवहेलना होत असेल, हे वेगळे सांगायला नको. एवढे मोठ्या संतापजनक व भयग्रस्त परिस्थितीत जीवन जगणाऱ्या शेतकऱ्यांनी आणखी किती संयम बाळगायला हवा ? शांत व संयमी स्वभावाचा बांध तुटण्याआधी वा त्यांच्या संतापाचा उद्रेक होण्याआधी मोकाट बिबट्यांचा बंदोबस्त तात्काळ केला जावा, असा निर्वाणीचा इशारा समस्त शेतकरी वर्गाने दिला तर त्यांचे चुकते कुठे ?
निर्माण भीती व होणारे नुकसान ध्यानी घेऊन भयग्रस्त शेतकरी शेतात जायला तयार नाहीये, तरीही वनाधिकारी त्यांच्या समस्येकडे लक्ष द्यायला तयार नाहीये. याचा संताप व्यक्त करीत जिल्हा परिषदेचे माजी सभापती दादासाहेब टेंगसे यांनी सुध्दा तात्काळ दक्षता घ्यावी म्हणून वनाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. तरी सुद्धा गोर-गरीब शेतकऱ्यांच्या जीवाची आणि त्यांच्या पशुधनाची यत्किंचितही पर्वा नसलेले मग्रुर वनाधिकारी बिबट्याला जेरबंद न करता किंवा त्यासाठीचे कोणतेही प्रयत्न अंमलात न आणता ते केवळ आणि केवळ सतर्कतेचे आदेशच देत आहेत. ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. ज्यामुळे त्यांची ही कृती नि वृत्ती अमानवीय असल्याचेच दिसून येत आहे. या कृतीत नि वृत्तीत तात्काळ बदल करून कर्तव्यावरील सर्व वनाधिकारी व त्यांचे सहकारी यांनी पाथरी तालुक्यातील सिमुर गव्हाण, खेडुळा नि बोरगाव या तिन्ही गावांसह परिसरातीलत शेतकऱ्यांची काय अवस्था होत असेल, याचा आपल्या परिवारील घटक असल्याचेच समजून मानवीय विचार करावा, अशी चालु वार्ता या मराठी दैनिकाची आग्रहाची विनंती आहे.
संकटात सापडलेले व भयग्रस्त असे शेतकरी तुम्हाला वनाधिकारी म्हणून मान, सन्मान देतात. तुमची इज्जत करतात. परंतु तुमच्याकडून व तुमच्या कर्तव्यरुपी सहकारातून जे अपेक्षित आहे, ते मिळले जावे, ही शेतकरी वर्गाची तुमच्या बद्दल आदरार्थी भावना नक्कीच आहे, भविष्यातही ती राहिली जाईल यात शंकाच नसावी. असे असूनही शेतकऱ्यांचा केवळ अंतच बघितला जाणार असेल तर मात्र हाच संयमी शेतकरी स्वहित जपण्यासाठी कधीही संतप्त बनला जाईल, याचा कोणालाही विसर पडता कामा नये. शेवटी कायदा, अधिकार आणि कर्तव्याची जाण शेतकरी हा राब राब राबणारा कष्टकरी असला तरी त्याला पूर्ण जाणीव आहे एवढे नक्की. भयाने चिंताग्रस्त बनलेला हाच शेतकरी अखेर भयमुक्त कधी करणार, हाच आर्त सवाल कर्तव्यावरील या वनाधिकाऱ्यांना केला गेल्यास आश्चर्य वाटू नये एवढे नक्की.
दरम्यान, बोरगाव शिवारातील काशिनाथ इंगळे यांच्या म्हशीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात त्यांची म्हैस मृत्यू पावली गेली. तर दुसरीकडे आत्माराम मोरे नावाच्या शेतकऱ्याच्या केलेल्या हल्ल्यात त्यांचा बैल बिबट्याने मारला. असं असतांनाच कोणतीही ठोस कारवाई न करता केवळ सतर्क राहा म्हणून सल्ले देणाऱ्या या वनाधिकाऱ्यांचे नेमके काय करायचे, असा प्रश्न जीवाच्या आकांताने कोणी विचारला तर ते चुकीचे ठरले जाईल का, हा खरा शासनाला सवाल आहे. एवढे सारे भयावह प्रकार होऊनही कर्तव्यावरील डीएफओ जोशी, आरएफओ चव्हाण, धनपाल बुचाले हे घटनास्थळी भयानक व चीड आणणारे कृत्य बघूनही त्यांनी कोणतीच ठोस भूमिका घेतली नाही किंवा तसे कोणतेही ठोस आश्वासन सुध्दा त्यांनी दिले नाही. केवळ सतर्क राहा, असा सल्ला देत ते निघून गेले, ही बाब संतापजनक अशीच म्हणावी लागेल. शासन कर्तव्यावर असूनही त्यांना जर शेतकरी विद्रोहाची भूमिकाच जर बजावयाची असेल तर ते आपल्या कर्तव्यात अकार्यक्षम आहेत असे समजून त्यांना अन्यत्र कुठेही पाठविले जावे आणि जे शेतकऱ्यांचे संरक्षण व वन्य प्राण्यांचे बंदीस्त संगोपन करुन शकतील अशाच अधिकाऱ्यांची या परिसरात नियुक्ती केली जावी, अशी मागणी केली गेली तर ती मुळीच चुकीची ठरली जावू नये असे वाटते.
सदर अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कोणतीही कसूर न करता शेतकऱ्यांना सहकार्य व मोकाट बिबट्यांचा तात्काळ बंदिस्त करुन त्याचेही संगोपन न केल्यास मात्र त्यांची बदली थेट चंद्रपूर किंवा नक्षली विभागात केली जावी, यासाठी निकराचे प्रयत्न केले जातील, याची नोंद सदर अकार्यक्षम अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी म्हणजे झाले. यासाठी चालु वार्ता हे मराठी दैनिक समस्त शेतकरी वर्गाच्या पाठीमागे खंबीरपणे ठाम उभे राहिले जाईल, यांची खात्री या निमित्ताने दिली गेल्यास आश्चर्य वाटू नये. संबंधित शेतकऱ्यांनी तात्काळ दै.चालु वाल्यांनी संपर्क साधावा, असे आवाहनही केले जात आहे.