
दैनिक चालु वार्ता उपसंपादक अमरावती -श्रीकांत नाथे
अमरावती (चांदूरबाजार) :- तालुक्यातील खेडेगावात बोगस डॉक्टर आपले बोगस दवाखाने थाटून बसले आहे.खेडे विभागात बोगस डॉक्टरांची चालती असून या डॉक्टरांनी विविध ठिकाणी दवाखाने थाटून रुग्णाच्या जीवास खेळून कोट्यावधीची संपत्ती जमा केली.मात्र;अद्यापही या गंभीर समस्येची दखल शासन व प्रशासनाकडून घेतल्या जात नसल्याची खंत गावकरांनी व्यक्त केली असून आरोग्य अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासन मात्र मुंग गीळून बसले आहे.
चांदूरबाजार तालुक्यातील गाव खेड्यात हिरूळ पूर्णा माधान वनी आसेगाव पूर्णा बोगस डॉक्टर दवाखाने थाटून बसले आहे.बंगाली डॉक्टरांना सामान्य आजाराचा कोणताही अनुभव नसताना रुग्णाकडून हजारो रुपयाची रक्कम उखडल्या जात आहे.या बोगस डॉक्टरांनी रुग्णाचा विश्वास संपादन करून त्यांच्याविषयी माहिती एकापासून दुसरीकडे पोहोचली जाते.डॉक्टर पदवीचे कोणतेही शिक्षण न घेता किंवा राज्याच्या आरोग्य विभागात नोंदणी न करता या रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांनी कोट्यावधीची संपत्ती जमा करून बंगले बांधून जमिनी खरेदी करीत आहे.आरोग्य विभागाची अशा बोगस डॉक्टरवर नजर असणे आवश्यक असताना मात्र;आरोग्य विभाग मुंग गिळून बसले आहे.अशा बोगस डॉक्टरांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनसमान्यांनी केली आहे.