
दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा उपसंपादक दीपक कटकोजवार
चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील पांढरकवडा येथे दि.१८ में रोजी शेतकरी वाचवा आंदोलन आयोजित करण्यात आल्याची माहिती या आंदोलनाचे प्रणेते किशोर तिवारी यांच्या अत्यंत जवळीक सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.
एकीकडे महाराष्ट्रातील ८० लाख कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी “पडलेल्या भावात कापुस न विकण्याचे अघोषीत आंदोलनं “मागील ६ महिन्यापासुन सुरु केलेले असतानाही कापसाच्या भावात सतत प्रचंड घसरण होत असल्यामुळे प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असुन आता मायबाप सरकारने महाराष्ट्रातील कापुस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पॅकेज द्यावे या रास्त मागणीसाठी जेष्ठ शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे प्रमुख नगदी पीक व पांढऱ्या सोन्याचे पीक वाचविण्यासाठी *शेतकरी वाचवा आंदोलन* येत्या १८ मे रोजी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील पांढरकवडा शहरातील तहसील चौकात असलेल्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संध्याकाळी ५ वाजता आयोजीत करण्यात आले आहे. यापूर्वी हे आंदोलनाचे आयोजन ३ मे लगा होणार होते. परंतु प्रचंड अवकाळी पावसामुळे आंदोलन पुढे ढकलण्यात आले होते . या दरम्यान कापसाच्या भावात घसरण अधिक वाढल्याने व सरकार या गंभीर विषयावर मौन बाळगून असल्यामुळे येत्या १८ मे रोजी आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला सहभाग द्यावा असे आव्हान शेतकरी आंदोलनाचे संयोजक अंकित नैताम ,मोहन मामीडवार ,विजय तेलंगे ,मोरेश्वर वातीले ,प्रेम चव्हाण ,अजय राजूरकर ,रोहन ठाकरे ,सुनिल राऊत,बाळासाहेब जाधव ,रमेश चव्हाण यांनी केले आहे .
महाराष्ट्रातील ८० लाखावर शेतकरी प्रचंड आर्थीक संकटात
मागील वर्षी कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव मिळाल्यामुळे यावर्षी विक्रमी १ कोटी १२ लाख हेक्टर मध्ये कापसाची लागवड करण्यात आली त्यामध्ये संपूर्ण विदर्भ, मराठवाडा ,खानदेश व उत्तर महाराष्ट्रासह मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात पेरा करण्यात आला होता सुरवातीला प्रचंड पाऊसाने कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व ७० टक्के पीक सुद्धा नासल्या गेले मात्र महाराष्ट्रातील ८० लाखावर शेतक-यांनी प्रचंड वाढलेला लागवडीचा खर्च लाऊन जेमतेम ३० ते ४० टक्के कापसाचे उत्पन्न घेतले व डिसेम्बर २०२२पासून कापसाचे भाव वाढतील या आशेने वाट पाहत आहे. कापसाचा भाव आता जेमतेम ७५०० रुपयावर येवुन अटकला आहे. मात्र महाराष्ट्रातील एकमेव नगदी पीक कापसाची दाणादाण ही केंद्र सरकारच्या कापूस उत्पादक शेतकरी विरोधी धोरणामुळे झाली असुन महाराष्ट्राचे सरकार सुद्धा या गंभीर विषयावर मौन बाळगून असल्यामुळे येत्या १८ मे रोजी हजारो केंद्र सरकारने कापूस निर्यात करण्यासाठी प्रति गाडी मागे ३०,००० /- अनुदान जाहीर करावे व महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील ८० लाखावर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ५ हजार रुपये अनुदान जाहीर करावे या मागणी साठी ‘कापसाची होळी सत्याग्रह’ पांढरकवडा येथे रयतांचा राजा शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर करणार असल्याची माहीती शेतकरी चळवळीचे प्रमुख नेते व शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांनी केली आहे .
महाराष्ट्रात या हंगामात ३२०० कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या?
यावर्षी कापसाची नापीकी व कापसाचा भाव पडल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात आले आहेत व यातच कर्जबाजारी ३२०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून त्यांची सूद घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा एकही मंत्री वा अधिकारी त्यांच्या दारावर गेला नसुन सध्या सर्वच शेतकऱ्यांच्या घरी लाखों क्विंटल कापुस पडला असुन जर कापसाचे भाव असेच पडत राहीले व केंद्र व राज्य सरकार उघडया डोळ्यानी हा तमाशा पाहत राहिले तर निष्पाप शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होतील अशी भीती किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी हा नेहमीच सुलतानी आणि आसमानी संकटाला सामोरे जात असतो. मात्र वर्षी शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे. सरकार मात्र जागत नसल्यामुळे आता आंदोलन शिवाय पर्याय नाही १८ मे च्या आंदोलनात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी शामिल व्हावे असे आवाहन गजेंद्रा आष्टेकर ,संतोष नैताम ,अतुल टेकाम ,शंकर अंधारे ,गजानन गोदूरवार यांनी केले आहे.