
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
नांदेड येथील सुप्रसिद्ध गायक सुनील गुरु यांची आज दैनिक चालू वार्ताचे मराठवाडा उपसंपादक ओंकार लव्हेकर यांनी आज मुलाखत घेतली.
सदरील मुलाखत की लवकरच युट्युब वर दैनिक चालू वार्ता या लिंक वर प्रकाशित होईल. यामध्ये सुनील गुरु यांनी अगदी मनमोकळे मनाने आपली मुलाखत प्रस्तुत केली आहे. त्यांनी आपल्याला गायनाचा छंद कसा लागला. व आपण नोकरी करत करत हा छंद कसा जोपासला याचे विश्लेषण केले आहे. सदरील मुलाखतीमध्ये नाट्यगीत, भक्ती गीत व चित्रपटातील एक गीत व इतर असे गायन उत्कृष्टरित्या प्रस्तुत केले आहे. त्यामुळे सुनील गुरू हे वयस्कर जरी असले तरीही ते अगदी ताठ मानेने अगदी तरुण मनाने गाणे गातात हे त्यांचे विशेष आहे. त्यांच्या या विशेषतीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.