
दैनिक चालु वार्ता उपसंपादक आष्टी-अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा):तालुक्यातील तळेगाव(शा.पंत) येथील श्यामजी पंत मंदिरातील आयोजित विकास कामा निमीत्त आ.केचे यांच्या सत्कार सोहळ्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना आर्वी विधानसभेचे भाजपा आ. दादाराव केचे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वर्धा जिल्हा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्विय सहाय्यक सुमित वानखेडे यांचे नाव न घेता चांगलीच खरडपट्टी काढल्याची व्हिडिओ क्लिप सध्या समाजमाध्यमात फिरत आहे त्यामुळे आर्वी भाजपा क्षेत्रात अंदरकी टाम टूम,उपरकी राम जाणे? असा प्रकार असल्याचे स्पष्ट दिसते आर्वी मतदार संघ हा पूर्णपणे काँग्रेसचा मतदार संघ असून तो भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात आणणे एवढे सोपे काम नाही हे अर्या गैर्या,नत्थु खैर्याचे काम नाही इथे जातिवंत पाहिजे माणसात खेळणारा माणूस पाहिजे,जमिनीवर चालणारा माणूस पाहिजे केवळ गाडीतून उतरून नमस्कार करणे सलाम करणे एवढेच नेतृत्व असेल तर जनता ही खपवून घेणार नाही आणि आम्ही त्यांना मान्यता देऊ शकत नाही केवळ चार दिवसाचे आले याला विकास म्हणू शकत नाही मागच्याही कालखंडात (सुधीर दिवे यांचे नाव न घेता) आम्ही तेच पाहिले आहे निवडणूक आली की कुणी नाही कुणी तयार होतो त्यांना ही परतून लावलं असा इतिहास आहे पी.ए.लोकांनी राजकारण केलं काय? तुम्ही तुमचं काम करा आमचं काम आम्ही करतो ते सोडून या आम्ही तुमचे स्वागत करतो यामुळे खीचाखीचीच राजकारण होत असून कार्यकर्त्यात नैराश्याचे वातावरण तयार होत आहे कश्याला मर मर करता हे कुठलं राजकारण आहे? असा प्रश्नही त्यांनी वानखेडे यांचे नाव न घेता केला जनता जनार्दनाला विकासात्मक दिलासा देण्याचे काम १०० टक्के आपण करणार आहोत धावण्याच्या आणि कुस्तीच्या खेळातही मी चीत होत नाही असा ही दम भरला खरा माणूस झोपडीत आहे त्याचे दुःख,विवंचना पहावे लागते यासाठी कित्येक वर्षापासून आम्ही दरबार भरवतो,पहाटे ५ वाजता पासून लोकांची सेवा करतो म्हणून आम्ही पती,पत्नीला लोकांनी नगरपालिकेत निवडून दिलं होते आता हिरवेगार मतदार संघ आहे म्हणून गडबड करू नका अशी आनंदाने विनंती आ.केचे यांनी केली शिवाय सुमित वानखेडे यांना २०२९ च्या निवडणुकीत येण्याचे सूतोवाच केले मी स्वतः फिरून तुम्हाला निवडून आणतो असे ही दिलासदायक म्हणाले निवडणूक आली की कीड लागल्यासारखं वादळ येत असते वादळात कार्यकर्त्यांनी सामील होवू नये असे आवाहन कार्यकर्त्यांना केले मागच्या पंचवार्षिक मध्ये आलेले वादळ पर्तवले आणि यावेळेसही या वादळाचा सामना करण्याकरता मी सतर्क असल्याचे म्हटले आहे यावरून आर्वी विधानसभा क्षेत्रातील भाजपा आ.दादाराव केचे यांना पुन्हा एकदा आमदारकीची संधी हवी असल्याचे स्पष्ट आहे पण या व्हिडिओ क्लिप वरील भाषणाने आ.केचे आणि सुमित वानखेडे यांचे अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले एवढे मात्र नक्की