
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना : जाफराबाद शहरात एका लहान मुलाला रस्त्यावर मोबाईलची बॅटरी सापडली आणि त्या लहान मुलांनी ती बॅटरी घरी घेऊन येत तिला विद्युत वायरच्या साह्याने चार्जिंग करण्याचा प्रयत्न केला. त्या बॅटरीचा स्फोट होवून त्या लहान मुलाच्या हाताची चार बोट निखळून पडल्याची घटना जाफ्राबाद शहरात घडलीय. अरबाज उर्फ गोलू असं या मोबाईल बॅटरीच्या स्फ़ोटात गंभीर जखमी झालेल्या मुलाचं नाव असून त्यावर सध्या त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार आहे.
अरबाज हा दोन दिवसांपूर्वी खेळत असताना त्याला रस्त्यावर एक मोबाईल एक मोबाईलची बॅटरी सापडली. त्याने ती बॅटरी घरी गेल्यानंतर चालू करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयन्त करत असताना त्यांनी बॅटरीला वायर लावून वायर प्लगमध्ये टाकून त्या बॅटरीला चार्ज करण्यासाठी बटन चालू केले. बटन दाबताच बॅटरीचा भला मोठा आवाज होऊन स्फ़ोट झाला. या स्फ़ोटात त्याच्या हाताची चारही बोट अक्षरशः खाली गळून पडली. तर त्याच्या छातीला आणि डोळ्याला जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला.
बेशुद्धावस्थेत नेले दवाखान्यात
बोटाचे तुकडे तुकडे गळून पडल्याने तो बेशुद्ध पडला. नातेवाईकांनी त्याला तातडीने उपचारसाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला उपचारसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये रेफर केले. त्यावर त्या ठिकाणी उपचार सुरु आहेत. मात्र या स्फ़ोटात त्याच्या हाताची चार बोट निकामी झाली आहेत. अरबाज यांच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने स्थानिक लोकांनी आर्थिक जमवाजमावी करत त्यावर उपचार करण्यासाठी मदत केली.