
दैनिक चालु वार्ता मराठवाडा उपसंपादक-ओंकार लव्हेकर
कंधार—- शिवा संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महात्मा बसवेश्वर यांची 892 वी जयंती गुरुवार 18 मे 2023 रोजी दुपारी 03 वाजता प्रा. मनोहर धोंडे सर यांच्या नेतृत्वात भव्य मिरवणुकीचे आयोजन केले आहे. या मिरवणुकीत अनेक गावचे महिला व पुरुष भजनी मंडळी सामिल होणार आहेत. भव्य मिरवणूक काढण्याची ही प्रथा 2005 पासून म्हणजे मागील 19 वर्षापासून चालू आहे. माईचे मंदिर कंधार येथून मिरवणुकीस सुरुवात होणार असून सराफा लाईन मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाराणा चौक, येथून संत नामदेव महाराज मंगल कार्यालय बस स्टँड समोर कंधार येथे समारोप होणार आहे. मिरवणुकीत संभाजीनगर येथील 21 जणांचे ढोल पथक व डीजे सह वीरशैव भजनी मंडळ आणि घोडेस्वार तसेच राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे उत्तराधिकारी गुरुवर्य राजशेखर शिवाचार्य महाराज अहमदपूरकर व गुरुवर्य शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुरकर हे भव्य रथामध्ये विराजमान होऊन सहभागी होणार आहेत .तरी या मिरवणुकीत हजारोच्या संख्येने सहभागी होऊन वीरशैव लिंगायत समाजाच्या शक्तीचे व शिस्तीचे दर्शन घडवावे .असे आवाहन महात्मा बसवेश्वर उत्सव समिती चे स्वागताध्यक्ष अँड. मुक्तेश्वरभाऊ धोंडगे ,अध्यक्ष बाबुराव फसमले ,कार्याध्यक्ष जी.एस .मंगनाळे यांनी केले आहे. गुरुवर्य शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुरकर ,गुरुवर्य राज शेखर शिवाचार्य महाराज अहमदपूरकर ,सिद्धदयाल शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर, आचार्य गुरुराज स्वामी अहमदपूरकर यांचे गुरुपदेश लाभणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. मनोहरराव धोंडे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शिवा संघटना तर उद्घाटक म्हणून बालाजीराव पांडागळे माजी सभापती पंचायत समिती कंधार तसेच प्रमुख उपस्थिती वैजनाथ तोनसुरे राज्य उपाध्यक्ष शिवा संघटना, धन्यकुमार शिवणकर राज्य सरचिटणीस ,विठ्ठलराव ताकबिडे प्रदेश सरचिटणीस शिवा कर्मचारी महासंघ, संजय कोठाळे मराठवाडा अध्यक्ष , इंजि. अनिल माळगे जिल्हा संपर्कप्रमुख , विजय धोंडगे मा. जिल्हा परिषद सदस्य, रामचंद्र येईलवाड मा. जिल्हा परिषद सदस्य ,संभाजी पाटील जिल्हाध्यक्ष शिवा संघटना,विश्वंभरराव मंगनाळे माजी कृषी अधिकारी, वीरभद्र बसापुरे जिल्हाध्यक्ष शिवा कर्मचारी महासंघ, शुभम घोडके जिल्हाध्यक्ष वि.आघाडी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या जयंती उत्सवात हजारोच्या संख्येने कंधार तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उपाध्यक्ष कोंडीबा बनसोडे, बाबुराव अभंगे, रोहित रोयलवाड, कोषाध्यक्ष दत्तात्रेय मंगनाळे ,सह कोषाध्यक्ष त्र्यंबक भोसीकर ,संजय पाटील, चंद्रकांत जोगदंड, सरचिटणीस संभाजी मानसपुरे ,नामदेव कल्याणकस्तुरे,गजानन किडे, मुख्य संघटक आनंदराव पेटकर, बालाजीराव भुरे, अभिषेक मानसपुरे ,कपिल नवघरे, चिटणीस मल्लिकार्जुन किडे, शिवराज भोसिकर, परमेश्वर पोटजळे, प्रसिद्धीप्रमुख माधव भालेराव, एस.पी . केंद्रे, सिकंदर शेख , दिगंबर डांगे, देविदास डांगे ,संतोष कराळे ,सोशल मीडिया प्रमुख दिनेश मानसपुरे,निखिल किडे ,बालाजी डोम, सल्लागार गणेशराव कुंठेवार ,अशोक मानसपुरे, संभाजी पावडे, बाबुराव कैलासे,युसुफ शेख, दिगंबर मरशिवणे, मन्मथ किडे ,प्रल्हाद घोरबांड , साहेबराव राशिवंत, बळीराम पवार, शिवसांब देशमुख ,डॉ.भुजंग कवठेकर, कार्यकारी सदस्य परमेश्वर बोंबले, एजाज शेख, गणेश गोरे ,गणेश तवंडे, एम.डी. पेठकर ,माधव अभंगे, व्ही एस आमलापुरे, गोपाळ किरपणे आदी जयंती महोत्सव कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.