
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
सोलापूर/माढा:आज १४ मे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नरसिंह प्रतिष्ठान नरसिंह नगर टेंभुर्णी यांच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नरसिंह प्रतिष्ठान यांच्याकडून गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा सन्मान करण्यात आला यामध्ये कु. समृद्धी शिवप्रसाद पवार हिस धनुर्धर ( आर्चरी ) या खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर ( गोवा, गुजरात, जम्मू काश्मीर तसेच महाराष्ट्रातील औरंगाबाद बुलढाणा अमरावती उस्मानाबाद सोलापूर सांगली गोंदिया) या ठिकाणी खेळत असताना २३ सुवर्ण पदक, ७ रोप्य पदक व ५ कांस्यपदक फटकावण्याचा मान तिला मिळाला आहे.
तसेच याच खेळात तिचा लहान भाऊ कू. आदित्य शिवप्रसाद पवार यांनी देखील उत्तम कामगिरी केलेली आहे. तसेच गुणवंत विद्यार्थी म्हणून १) श्रीजित प्रशांत पवार २) अथर्व प्रशांत शिंदे ३) पृथ्वीराज गणेश शिंदे ४) आयुष सुनील गायकवाड यांना सन्मानीत करण्यात आले.
यावेळी बोलताना योगेश बोबडे यांनी छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देऊन नरसिंह प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले, यावेळी टेंभुर्णी शहरातील विविध मान्यवर व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.