
दैनिक चालु वार्ता मोखाडा प्रतिनिधी :सौरभ कामडी
आदिवासी संस्कृती जोपासण्यासाठी व क्रांतिकारक महापुरुषांचे विचार व त्यांची ओळख समाजाला व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन मोखाडा तालुक्यातील कोचाळे येथे दिनांक १३ मे २०२३ रोजी लग्न सोहळा आयोजित केला.नवरदेव मिलिंद पांडुरंग बदादे . व नवरी अस्मिता काशिनाथ गारे लग्न होण्या अगोदर धरतीमातेची सूर्य चंद्र डोंगर पशू पक्षी यांच्या प्रतीकृतीचे व वृक्षाचे पुजन करून क्रांतिकारक महापुरुषांना अभिवादन केले या मध्ये लग्न हे खूप वेगळे प्रकारे लग्न पार पडले यामध्ये आदिवासींचे संविधानाक अधिकार व पेशा ॲक्ट १९९६ हे पुस्तके ३०० पुस्तके वाटप करण्यात आले . आदिवासी समाज हा निसर्गाला मानणारा निसर्ग पुजक आहे.आदिवासी संस्कृती टिकवने ही प्रत्येक आदिवासी माणसाची जबाबदारी आहे.
मोखाडा भागात आदिम लग्न सोहळा पार पडला त्यामुळे निसर्ग पुजक लग्न सोहळे प्रत्येक ठिकाणी झाले पाहिजेत अशी उपस्थितांनी भावना व्यक्त केली या लग्न सोहळ्यानिमित्त मान्यवर उपस्थित आमदार सुनिल भुसारा साहेब मोखाडा पंचायत समिती उपसभापती प्रदीप वाघ ,सरपंच हनुमंत फसाळे, जागले सर उपसरपंच नंदकुमार वाघ आनंद कामडी तसेच जिल्हा परिषद सदस्य हबीब शेख सरजेराव भारमल आदिवासी गायक शरद टीपे व बिरसा ब्रिगेड सह्याद्री म,राज्य व आदिवासी युवा फाउंडेशन पालघर ठाणे नाशिक सर्व पदाधिकारी उपस्थित होते.