
दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा उपसंपादक -दीपक कटकोजवार
चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील केळापूर येथे तिन दिवसीय दि.११,१२ व १३ मे २०२३ ला बैल जोडीच्या जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केळापुर-आर्णी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. संदीप धुर्वे उद्घाटक म्हणून लाभले होते. शेवटच्या दिवसा च्या कार्यक्रमास मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर यांनी उपस्थिती दर्शविली याप्रसंगी रामराज्य ग्रूप तर्फे हंसराज अहिर यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व तसेच शंकरपटातील उत्कृष्ट बैलजोडीच्या चालक व मालकाचा श्री.अहिर यांनी सत्कार केला तर शंकरपटाचे योग्यरीत्या आयोजन करून अहिर यांना आमंत्रित केल्याबद्दल तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविरत प्रयत्न केल्याबद्दल भाजपा मच्छिमार सेलचे जिल्हा सरचिटणीस प्रदीप भनारकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
अहीर साहेब यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हटले कि तूम्ही आम्हाला चांगल्या कार्यासाठी ज्या ज्या वेळी बोलवाल त्या त्या वेळी आम्ही तुमच्या कार्यक्रमात वेळात वेळ काढू व अशीच उपस्थिती लावू असा विश्वास मार्गदर्शन पर भाषणातून आयोजकांना दिला.
यावेळी कार्यक्रमास भाजपा तालुका अध्यक्ष आनंद वैद्य,किशोर बावने, शंकर लालसरे,भाजपाचे नेते पुनम तिवारी, भाजपा आदिवासी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रतिक कुलसंगे, मोहन कनाके, सतीश झांझरिया, नगर सेवक बंन्टी जुवारे,भाजपा मच्छिमार सेल चे जिल्हा सरचिटणीस प्रदिप भनारकर,रामराज्य ग्रुपच्या सर्व पदाधिकारी सदस्यांसह, केळापूर ग्रामपंचायतचे सरपंच व उपसरपंच आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमास केळापूरवासीय नागरिक प्रेक्षक यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती….