
दैनिक चालु वार्ता पैठण तालुका प्रतिनिधी-गजानन ठोके
पैठण तालुक्यातील कोळी बोडखा सानपवाडी गृप ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या एका ग्रामपंचायत सदस्य पदाच्या पोटनिवडणूसाठी दि 18 मे रोजी मतदान झाले या निवडणुकीत तीन उमेदवार उतरले होते पैठण तालुक्यातून एकाच ठिकाणी पोटनिवडणूक होत असल्याने पूर्ण तालुक्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते
दि 19मे रोजी मतमोजणी पैठण येथील तहसील कार्यालयात पार पडली यात मनिषा अमोल सुवर्णकार या 145 मतांनी विजयी झाल्या एकूण झालेल्या मतांपैकी सौ मनिषा सुवर्णकार यांना 266 तर सुनिता मगरे यांना 122 व पार्वती ठोके यांना 65 तर नोटा ला 11 मते मिळाली
या निकालाची माहिती मिळताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गावात विजयी मिरवणूक काढली तर नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य मनिषा सुवर्णकार याचे सरपंच लतीफ सय्यद सर उपसरपंच विलास बापू गायकवाड ग्रामपंचायत सदस्य एजास पटेल देविदास मगरे व गावकऱ्यांनी अभिनंदन केले