
दैनिक चालू वार्ता छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधि: अन्वर कादरी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेशजी लिलोठिया तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनु. जा.विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीआंबहिरे यांच्या आदेशाने औरंगाबाद ग्रामीण काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदी कृष्णा भंडारी यांची नियुक्ती करण्यात आली.
या निमित्ताने नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी औरंगाबाद काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष शेख युसुफ लीडर यांचे राहते घरी भंडारी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉ.अरुण शिरसाट, शहर जिल्हाध्यक्ष औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनु. जा.विभाग, औरंगाबाद काँग्रेसचे महासचिव अनिस पटेल, हरचरणसिंग गुलाटी, एम.ए.अजहर, प्रा.शिलवंत गोपणारायन, आंनद भामरे, रवी लोखंडे, शिरीष चव्हाण, अशोक चक्रे दादा,असमत खान, उत्तम दणके, उमाकांत खोतकर, अनिता भंडारी, मंजूताई लोखंडे, सुनील साळवे, सौरभ खंडारे, विशाल घोडके, अमित साळवे, यादव अहिरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.