
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली ता.20 चंदननगर : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदच्या वतीने अकलूज येथे आयोजित कुस्ती स्पर्धेत खराडीची कन्या कृतिका अमोल पवार हिने तिसरा क्रमांक पटकविला. परिषदेच्या वतीने पाचवी सब ज्युनियर १७ वर्षाखालील मुलींची राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा २०२३ अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे पाच ते सात मेदरम्यान आयोजित करण्यात आले होते. कृतिका पवार हिने पुणे जिल्हा शहर गटातून ४० किलो वजन गटातून कुस्ती जिंकत तिसरा क्रमांक पटकविला.शिरूर तालुका मित्र परिवाराच्या वतीने संस्थापक अध्यक्ष बाळा भाऊ पऱ्हाड व सौ तेजश्री बाळाभाऊ पऱ्हाड यानी सन्मान केला.