
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती :लग्नाला उणेपुरे ४ महिने होण्यापुर्वीच पतीने पत्नीचे अश्लिल व्हिडीओ व फोटोग्राफ्स काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. मी तुझा पती आहे,अशी अधिकारवाणी वापरून त्याने पत्नीला व तिच्या आईवडिलांना धमकी दिली.२३ फेब्रुवारी ते २४ जूनदरम्यान अमरावती येथे ती कौटुंबिक छळाची मालिका चालली.
याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी २५ जून रोजी पिडित नवविवाहितेचा पती आकाश,सासरा भाष्कर,सासू वंदना,दीर उदय,नणंद नंदिनी (सर्व रा.अमरावती) यांच्याविरूध्द कौटुंबिक छळ,विनयभंग व धमकीचा गुन्हा दाखल केला.
सविस्तर घटना अशी की,तक्रारीनुसार,फिर्यादी तरूणीचे अमरावती येथील आकाश नामक मुलाशी २३ फेब्रुवारी रोजी मोर्शी येथे लग्न झाले.लग्नात तिच्या वडिलांनी जावयला जवळपास २०० ग्रॅम सोने तथा ४०० ग्रॅम चांदी दिली.जावई व त्याच्या कुटुंबियांच्या सांगण्यावरून लग्नात सुमारे १२ लाख रुपये खर्च देखील केला.दरम्यान लग्न होऊन ती सासरी अमरावतीला नांदावयास आली.तेव्हा सासू व नणंदेने तिच्याकडील सोन्याचे चांदीचे सर्व दागिने,भेट वस्तू स्वत:च्या ताब्यात घेतले.लग्नाच्या तिसऱ्या चौथ्या दिवसांपासूनच तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला.
पतीने जबरदस्तीने पत्नीला पाजली दारू
पती आकाशने बेडरूममध्ये पत्नीचे अश्लील व्हिडिओ व फोटो काढले.तिने नकार दिला असता, ‘मी तुझा पती आहे’ मला व्हिडिओ काढण्याचे पूर्ण अधिकार आहेत.असे त्याने तिला अधिकारवाणीने बजावले.त्या कारणावरून पिडिताला मारहाण देखील केली.आरोपी आकाशने पत्नीला दारू देखील पाजली.