
त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी…. दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे…
देगलूर: दिनांक 20 जुलै २०२३ रोजी गुरूवारी बिलोली देगलूर तालुक्यात दुपारी ४ ते ५ तास ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने पिकांसहित शेतजमिनी खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या क्षेत्रातील लवकरात लवकर शासनाने पंचनामे करून भरीव मदत कशी देता येईल यासाठी मुंबई येथे चालू पावसाळी अधिवेशना मध्ये आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांनी सभापती महोदयांना विनंती केली
दरम्यान देगलूर बिलोली तालुक्यातील परिसरात गेल्या १० ते १५ दिवसांपासून सततचा पाऊस सुरू होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जमा झाल्याने पेरलेले बियाणे उगवलेच नाही. शेतकरी या संकटाचा सामना करत असतानाच गुरूवारी २० जुलै रोजी परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने पिकासहित शेत जमिनी खरडून गेल्या तर काही गावात पुराचे पाणी शिरले आहे.या
ढगफुटीसदृश्य उन्हाळी वझरगा लक्का अटकळी आळंदी, केरूर फाटा-केरूर, – केसराळी – रामपूर या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या पुलावरून पाणी ओसंडून वाहत असल्याने रस्ते बंद पडून काही काळ नांदेड हैद्राबाद हायवेचा संपर्क तुटला होता. यासह सर्व शेताला नदीचे स्वरूप झालेल्या ढगफुटी पावसामुळे थोडीफार निघालेले शेतातील मोडही वाहून गेली आहेत.*या दरम्यान देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश भाऊ अंतापूरकर यांनी चालू पावसाळी अधिवेशन मुंबई येथून देगलूर येथील तहसीलदार व उपजिल्हाधिकारी बि डि ओ यांना पूर परिस्थितीचा आढावा घेऊन अहवाल पाठवण्यास सांगितले सुगाव मनसकरगा सावरगाव सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की आज झालेल्या ढगफुटीमुळे वन्नाळी, सावरगाव, सुगाव प्रचंड भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे देगलूर तहसीलदार व बी.डि.ओ यांनी वन्नाळी फाट्याला जाऊन पाहणी केल्यानंतर सुचना केले की सुगाव व सावरगाव गावच्या नागरिकांना हॉटेलवर व गुरुद्वारात राहण्याची व्यवस्था केलेलि आहे तरी कोणी बाहेर गावी गेले असतील त्यांनी तिथेच थांबावे गावाकडे येण्यासाठी प्रयत्न करू नये अशी सूचना देगलूर तहसीलदार व बि.डी.ओ यांनी केलेले आहे.* ज्या ज्या परिसरात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या गावातील व परिसरात जनतेने नदी नाल्य ओलांडू नये आणखी मोठा पाऊस येण्याची शक्यता आहे काळजी घ्यावी अशी विनंती बिलोली देगलूर मतदार संघाचे आमदार जितेश भाऊ अंतापूरकर यांनी सोशल मीडिया मार्फत जनतेला विनंती केली.