
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे…
देगलूर: दिनांक 20 जुलै 2023 रोजी देगलूर तालुक्यातील खानापुर सर्कलमध्ये अतिवृष्टी झालेली .अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी वन्नाळी येथे नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब,तहसीलदार साहेब,बि.डी.ओ.साहेब आले असता यावेळी वन्नाळी येथील नागरीकांनी काल झालेल्या पावसामुळे गावात पाणी शिरुन अनेकांच्या घरात पाणी जावुन मोठ्याप्रमाणात नुकसना झाल्याने समस्या मांडले यावेळी मा.सदस्य शिक्षण व क्रीडा समिती जिल्हा परिषद सदस्य बस्वराज पाटील वन्नाळीकर व आजुबाजुच्या भागातील नागरीकांनी वन्नाळी, सुगाव,लख्खा फाटा येथील जिल्हाधिकारी साहेबांसोबत उपस्थित राहुन परिस्थितीची पाहणीकरतेवेळेस काल पासुन चालु असलेल्या अतिवृष्टीबदल खानापुर सर्कल मधील माहीती जाणुन दिली व इतिहासातील सर्वात जास्त नुकसान यावर्षी झाल्याची बाब जिल्हाधीकारी साहेबांना निदर्शनास बस्वराज पाटील यांनी आनुन दिले. अतिवृष्टीमुळे पंचनामा न करता शेतकर्यांना सरसकट मदतीची मागणी श्री बस्वराज पाटील यांनी केले असता जिल्हाधीकारी साहेबांनी सर्कल मधील सर्व गावाचे १०० टक्के नुकसान झाल्याचे मान्य करत सरसकट दुष्काळी अनुदान,विमा मंजुर करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवुन देण्यात येईल, ज्या शेतातील गाळ वाहुन गेली आहे त्यासर्वच शेतकर्यांना पंधरा हजार रुपये. अतिरीक्त मदतीचा प्रस्ताव,जनावरांचे नुकसान,घराचे नुकसान मिळवुन देवू असे जिल्हाधीकारी साहेबांनी बस्वराज पाटील यांना सांगीतले…