
हे राजकारण आहे भावा इथं सगळं चालत…
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी मंठा/सुरेश ज्ञा. दवणे..
जालना मंठा…
सध्या राज्याचे राजकारण नेमके कसे सुरु आहे हे कुणालाही समजायला मार्ग नाही. भाऊ, आपण ज्यांना सत्तेत बसविले त्यांनीच विरोधकांशी गट्टी करून जवळ केले आणि एका पंगतीत बसलेत म्हणतात जनतेच्या भल्यासाठी केलं आता तूच सांग भाऊ कोणासाठी झालं. हे फोडाफोडीचे राजकारण भविष्यात चांगलेच महाग पडणार असल्याची कुजबुज चावडीवर सुरु होती, तेव्हाच एकाने, भाऊ, आता नागरिकांनी आपली एकजूट दाखविण्याची गरज आहे. तेव्हाच या राजकारण्यांना समजेल की लोकशाही म्हणजे काय असते. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो तमाशा सुरु आहे तो चुपचाप टीव्हीवर पाहा अन् आपापले मत व्यक्त करा. पुढील काळ सांगेलच, अशी चावडीवरच्या गप्पात चर्चा सुरु होती…