
दत्ता केंद्रे ने आपले पासबुक लावून भरला पिक विमा…
दै.चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
कंधार :- कंधार तालुक्यातील कळका व कळकावाडी येथील शेत जमिनीवर नावंद्याचीवाडी येथील सीएससी सेंटर चालक दत्ता माधवराव केंद्रे यांने स्वतःच्या नावे पासबुक लावून शेतकऱ्याच्या ७/१२ वर पिक विमा भरून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची नावे पदमीनबाई किसन केंद्रे गट नंबर ३०० क्षेत्र १५ आर कळकावाडी, माधव बालाजी गुडमे गट नंबर ३८३क्षेत्र१ हेक्टर कळकावाडी, चतुरबाई संग्राम गायकवाड सामायिक क्षेत्र गट नंबर ४६६ क्षेत्र १ हेक्टर २०आर कळका, ज्ञानोबा सिताराम पुटवाड मयत गट नंबर ३८१क्षेत्र ७०आर कळकावाडी,पदमीनबाई किशन केंद्रे गट नंबर ४५२ क्षेत्र ३०आर कळकावाडी या पाच शेतकर्यांच्या सर्वे नंबर वर दत्ता केंद्रे यांनी स्वतःचे पासबुक लावून पीक विमा शेतकऱ्याच्या पाठीमागे भरून फसवणूक केली आहे शेतकऱ्याकडे सर्व पुरावे असून फसवणूक करणाऱ्या दत्ता केंद्रे याच्यावर कठोर कारवाई करून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी कळका व कळकावाडी येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे…