
ज्याचे आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या सहकार्यातून माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या प्रयत्नातून विशेष योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात आला…
दैनिक चालू वार्ता
उपसंपादक उस्मानाबाद
नवनाथ यादव
उस्मानाबाद:-भूम शहरातील पेठेमधील श्री दत्त मंदीर येथे दुसऱ्या मजल्यावरील सभागृहाच्या बांधकामाचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष संजय गाढवे व १०८ष.ब्र. विरुपाक्ष गुरुगिरी शिवाचार्य मानुरकर महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. येथील पेठेमधील श्री दत्त मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर सभागृह बांधण्याचे आश्वासन माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी दिले होते. राज्याचे आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या सहकार्यातून माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या प्रयत्नातून विशेष वैशिष्ट योजनेतून निधी उपलब्ध करून अधिक मासानिमित्त इष्टलिग महापुजा आर्शीवचन महाप्रसाद या कार्यक्रमाचे औचित्य साधत श्रीदत्त मंदीराच्या सभागृहाच्या बांधकामाचा शुभारंभ विकासरत्न संजय नाना गाढवे व १०८ ष.ब्र. विरूपाक्ष गुरुगिरी शिवाचार्य मानुरकर महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सुनील थोरात , रणजीत साळुके, अशोक तोडकर, शिवशंकर खोले, सिध्देश्र्वर मनगीरे, शिवाप्पा उंबरे, श्रीकांत नकाते, प्रकाश शास्त्री महाराज, ओम स्वामी, अतुल स्वामी, धनंजय शेटे, नितीन होळकर समाधान खराडे, प्रभाकर शेटे, अमीत होळकर, संदीप खराडे, संजय होळकर, शशीकांत बिरबळे, बळे काका, महेश होनराव, गणेश उंबरे, पिंटू मनगीरे,सोलापुरे काका, अमीत होळकर , महेश शाहीर, रमेश रणखाब, भैय्या उंबरे, शाम होळकर, किरण दंडनाईक, कृष्णा शेटे,यांच्यासह आदी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.