
दैनिक चालू वार्ता
छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधि
अन्वर कादरी ठाकरे गटाच्या नेत्या आणि खासदार प्रियांका चतुर्वेदी यांना शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनी लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, आदित्य ठाकरेंनी सौंदर्य पाहून चतुर्वेदींना उमेदवारी दिली. त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
शिरसाट म्हणाले आहेत की, काल उद्धव ठाकरे यांची उत्तर भारतीयांची सभा झाली. या सभेत प्रियांका चतुर्वेदी या शिवसेनेवर भाषण करत होत्या. गद्दारांचं काहीतरी केलं पाहिजे, असं वाक्य त्यांच्या भाषणात होतं. कोण आहेत या चतुर्वेदी, त्यांच्याबद्दल चंद्रकांत खैरे यांनी असं म्हटलं होतं.
ते म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी त्यांचं (प्रियांका चौतुर्वेदीं) सौंदर्य पाहून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. आधी त्या काँग्रेसमध्ये होत्या आणि आता त्या आम्हाला निष्ठेचे धडे देत आहेत.
शिरसाट पुढे म्हणाले की उद्धव ठाकरे पुन्हा तेच-तेच बोलले. आम्हाला सोडून गेलेले एक एक काय घेऊन जात, सगळ्यांना घेऊन जा असं उद्धव ठाकरे म्हणाले. असं एखाद्या नेत्यानं बोलावं हे खूप विचित्र आहे…
आदित्य ठाकरे यांचा पलटवार
संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांनीही पलटवार केला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, ”हे जे बोलत आहेत, त्यांना त्यांची किंमत कळली आहे. अशा विचाराची लोक, हे सडके विचाराची लोक आहेत. अशा विचारांचे लोक राजकारणात टिकले कसे, असा प्रश्न पडतो. जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल.