दर्यापूर-अंजनगाव सुर्जी विधानसभा क्षेत्रातील हजारो शेतकऱ्यांची केंद्रांवर उपस्थितीती…
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (दर्यापूर) :केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना १४ व्या हप्त्याचा लाभ मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते २७ जुलै रोजी वितरीत करण्यात आला.देशातील शेतकऱ्यांना ज्यामध्ये १ लक्ष २५ हजार तर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना १४ हजार ५०० कृषी समृद्धी केंद्र समर्पण करण्यात आले होते.तसेच सल्फर लेपित युरिया चे उद्घाटन करून देशातील शेतकऱ्यांना समर्पण करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर दर्यापूर-अंजनगाव सुर्जी विधासभा क्षेत्रातील शहर व ग्रामीण भागातील ९५ पैकी ३९ कृषी समृद्धी केंद्रावर मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सिकर (राजस्थान) येथील संबोधन कार्यक्रमाचे थेट प्रेक्षेपण भाजपचे माजी आमदार रमेशजी बुंदीले,शहर अध्यक्ष,मंडळ अध्यक्ष,पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना दाखविण्यात आले.तसेच दर्यापूर कृषी विभागाच्या वतीने पंचायत समिती कार्यालयातील बचत भवन येथे सुद्धा शेतकऱ्यांना मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संबोधन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण २७ जुलै २०२३ रोजी दाखविण्यात आले अशी माहिती भाजपचे दर्यापूर-अंजनगाव सुर्जी विधानसभा प्रमुख गोपाल चंदन यांनी माहिती दिली.