
दैनिक चालू वार्ता
नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी समर्थ दादाराव लोखंडे
श्रीक्षेत्र माहूर: सद्या महाराष्ट्रामध्ये पावसाने थैमान घातले आहे.मराठवाड्यामध्ये जोरदार अतिवृष्टी झाली त्यातल्या त्यात नांदेड जिल्ह्यातील किनवट माहुर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.त्याचा फटका अनेक शेतकर्यांना झाला.पैनगंगेलाही पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली.अनेक शेतकर्यांची पिके अक्षरशाः वाहुन गेली.अनेकांच्या शेतात पाणी साचले.त्यामुळे शेतकर्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.आधीच दुबार पेरणी त्यात हे अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिकासोबत शेतकरीही पुरता कोलमंडला.त्यात प्रशासनाची उदासिनता. दिसून येत असताना वेळेवर पंचनामे होत नव्हते की कोणती ठोस मदत मिळत नव्हती बळीराजा मेटाकुटीला आला.शेतीचे हाल तर झालेच परंतु तालुक्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणात घरांचीही पडचढ झाली.त्याचीही कोणी दखल घेत नव्हते.अशा परिस्थितीमध्ये सर्व बाजुने नागरिक हवालदिल झाले असताना हिंगोली लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार मा.हेंमत पाटील यांचा नुकसान ग्रस्त भागात दौरा झाला.प्रशासनाला चांगला हाबाडा देत तहसिलदारासह सर्व प्रशासकीय यंत्रनेला फैलावर घेतले.नागरीकासमोरच अधिकार्यांना झापले.त्यांच्या कर्तव्याची जाणिव करूण देत नागरींकाना आश्वासित केले.त्याचा परिणाम एवढा झाला की,स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले.तात्काळ नुकसानग्रस्त भागाचे दौरे सुरु झाले.पंचेनामे करूण गरजुना तातडीने मदतीचे धनादेश वितरीत करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू झाले.तसेच पूरग्रस्ताना अन्न धान्याची किट व गरजु महिलांना साडी चोळी देण्याचे काम जोमाने सुरू झाले.या कामात श्री.रेणुका देवी संस्थानाचीही मदत मोठ्या प्रमाणात घेतली जात आहे.यामुळे नागरीकांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे.तसेच मा.खासदार हेमंत पाटील यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.प्रत्येक लोकप्रतीनिधीनी अशा प्रकारची समयसुचकता दाखवून वेळ प्रसंगी सामान्य नागरीकांच्या मदतीला धावून यावे.अशा प्रकारच्या बोलक्या प्रतिक्रिया काही सुजाण नागरीकांकडून दिल्या जात आहेत.