
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा. दवणे.
मंठा मनोहर भिडे यांनी महापुरुषांच्या बद्दल केल्याल्या बेताल वक्तव्या प्रकरणी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावे असे निवेदन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदे सेनेच्या वतीने मंठा पोलिस निरीक्षक मारुती खेडकर यांना दिनांक ०१ ऑगस्ट २०२३ रोजी देण्यात आले. महाराष्ट्र मध्ये मनोहर भिडे यांच्या सभा मोठ्या प्रमाणात चालू आहे१५ ऑगस्ट हा आपला स्वतंत्र दिवस नाही तिरंगा आपला राष्ट्रीय ध्वज नाही जनगणमन आपले राष्ट्रगीत नाही आणि देशातील सर्व महापुरुषाबद्दल हा महापुरुषांचा चुकीचा इतिहास सांगून अपमान करत आहे. भारत देशात राहतो देशाच खातो आणि देशाच्या तिरंगा बद्दल अपमान जनक बोलतो अशा बिनडोक मनोहर भिडे महाराष्ट्र अमरावती येथील सभेमध्ये महात्मा गांधी यांच्या विषयी गरळ ओकली अशा मोकाट कुत्र्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा मनोहर भिडेच्या सभेला परवानगी देऊ नये महाराष्ट्रामध्ये सभा घेऊन युवक तरुणांना भडकवण्याचे काम मनोहर भिडे करतात म्हणून भिडे हा देशाचा अपमान करत असेल आणि राज्य सरकार त्याला पोलीस सुरक्षा देतात मनोहर भिडेला सुरक्षा देऊ नये तसेच त्याच्या संघटनेवर महाराष्ट्रात बंदी घालावी सभा मेळावे भाषणावर बंदी घालावी, हया देशद्र- हाचे बॅनर लावण्यात बंदी घालावी महात्मा फुले यांना भर सभेत शिवीगाळ करतो यामुळे बहुजनाच्या भावना दुखवत आहे अशा कोणत्याही महापुरुषाबद्दल बेताल वक्तव्य करणारा मनोहर भिडे यांच्यावर कधी कारवाई होईल असा प्रश्न निर्माण होत आहे.या वेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मधुकर झरेकर, ऍड. राजेश खरात, अशोक घनवट, त्र्यंबक हजारे, भीमराव वाघ,संभाजी बनकर,कैलास बनकर, कैलाश घनदाट,गणेश घनवट , महादेव उकंडे , शाम उकंडे, बालासाहेब घनवट,
धरम गायकवाड शिवशंकर विधाते ज्ञानेश्वर काकडे, दत्ता गोरे, विकास घनवट, योगेश घनवट.व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे छत्रपती शिवाजी महाराज,फुले,शाहु, डॉ.आंबेडकर यांच्या विचारांवर काम करणाऱ्या संघटना व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.