
शेतकऱ्यांची मुले वेगवेगळ्या पदावर गेले…
दै.चालू वार्ता
प्रतिनिधी,उमापूर कृष्णा जाधव
गेवराई/उमापूर, उमापुर मधील व उमापूर परिसरातील शेतकरी कुटुंबातील मुलांनी आज आपल्या आई-वडिलांच्या मेहनतीचे फळ मिळाले.
उमापूर मधील ठाकरवाडी तांडा येथील अविनाश चव्हाण-पुणे सिटी पोलीस मध्ये,बळीराम भोसले-ठाणे शहर पोलीस,मिलिंद भोसले -हे अहमदनगर एस.आर.पी.एफ.
व गणेश गवळी-सहाय्यक कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग,
हे चारही गेवराई तालुक्यातील ऊमापुर मधील असून,आपल्या आपल्या गावाचे नाव यांनी महाराष्ट्रभर व देशभर मोठे केले असून,यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अत्यंत गरीब कुटुंबातील या युवकांनी चांगलीच बाजी मारली.
मिलिंद भोसले हे एस आर पी एफ मध्ये,हा युवक एका पारधी समाजातील युवक असून घरच्यांची अशी बिकट परिस्थितीत आपले शिक्षण चालू ठेवले,व आपल्या ध्येयापर्यंत पोहोचले यांच्यामुळे
पारधी समाजातील युवकांना नवीन चालना मिळेलच,कारण भटकलेला हा समाज या समाजातील ऐंशी टक्के लोक शिक्षणा पासून वंचितच असून मिलिंद भोसले याने आपल्या कुटुंबाची व आपल्या समाजाची मान शिक्षणा मधून उंचावली आहे,
व सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
व अविनाश चव्हाण पुणे सिटी पोलीस मध्ये जॉईन होऊन,आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले असून व बंजारा समाजाची मान ऊंचावली असून,हे युवक एका छोट्या खेड्यातून बारीक वस्त्यातून,शिक्षण घेऊन,आज चांगल्या पदावर गेले असून,आपल्या गावाचे व आपल्या कुटुंबाचे नाव लौकिक केले आहे.
आपल्या ध्येयापर्यंत पोहोचलेल्या या चारही युवकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.या उमापूर गावायांनी या उमापूर गावामधील,सेवालाल नगर, गणेश नगर, भवानी नगर,भीम नगर,
व उमापूर मधील सर्व युवकांनी यांचा सत्कार समारंभ ठेवला असून या कार्यक्रमाला गावातील काही सामाजिक कार्यकर्ते,मच्छिंद्र चव्हाण, राहुल राठोड,भैय्या कुऱ्हाडे,सचिन राठोड,सुभाष चव्हाण,रवीशेठ कापसे,नारायण साळवे,लहू कापसे,
रमेश साळवे,दैनिक.चालू वार्ता प्रतिनिधी कृष्णा जाधव,भाऊ चव्हाण,व इतर कार्यकर्ते उपस्थित होते,
व सर्व कार्यकर्त्यांचे उपस्थित हा सत्कार कार्यक्रम पार पडला.