
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
नादेड (देगलूर);जिल्हा परिषद शिक्षण विभागाने लेखी आश्वासन देऊनही खानापूर जि.प. शाळेत इंग्रजी शिक्षक देण्यात आला नाही. त्यामुळे समस्त गावकऱ्यानीपुन्हा एकदा जिल्हाधिकरी व जि.प. प्रशासनाला लेखी निवेदन देऊन २१ ऑगस्ट रोजी खानापूरच्या शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.जि.प. शाळा खानापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२२- २३ मध्ये वर्षभर विज्ञान व गणित विषयाचा शिक्षकउपलब्ध नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांचेशैक्षणिक नुकसान झाले. याबाबतशिक्षण विभागाला वारंवार मागणी करुनहीशिक्षक देण्यात आला नाही. आता एकशिक्षक देण्यात आले असून इंग्रजीविषयाचा शिक्षक उपलब्ध नाही. दि. १५जून २०२३ रोजी गावकऱ्यांनी शिक्षकमागणीसाठी शाळेला कुलूप ठोकले होते. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने १५ दिवसात शिक्षक उपलब्ध करुन देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आता १५ ऑगस्ट उजाडले तरी प्रशासनाकडूनशिक्षक देण्यात आला नाही. त्यासाठीसर्व गावकऱ्यांनी येत्या २१ ऑगस्टरोजी पुन्हा शाळेला कुलूप ठोकरण्याचाइशारा दिला आहे. याबाबतचे निवेदनजिल्हाधिकारी व जि.प. शिक्षण विभागालादेण्यात आले आहे. यावेळी गावकऱ्यांची उपस्थिती होती.