
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड (कंधार) :- नांदेड जिल्हातील तसेच कंधार तालुक्यातील मौजे गुंडा नागबर्डी येथे नागपंचमी व नागोबारायाच्या यात्रेनिमित्त भारतीय जनता पक्षाचे लोहा कंधार विधानसभा प्रमुख युवानेते प्रवीण पाटील चिखलीकर यांनी नागोबारायाचे दर्शन घेतले .परीसरातील जनते सोबत चर्चा केली. तसेच नागबर्डी देवस्थानचा विकास करण्यासाठी. निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.देवस्थानच्या व गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.आणि प्रवेशद्वाराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी माजी सरपंच सचिनदादा पाटील चिखलीकर, साईनाथराव पाटिल कपाळे, माजी सरपंच मारोती पाटील सुर्यवंशी ,चैतन्य केंद्रे, साईनाथआप्पा कोळगीरे, माणिकराव शिंदे, शहाजी पा. मोरे, आनंदराव शिंदे, अशोकराव शिंदे, नागोराव शिंदे, श्रीराम शिंदे अनेक भाविक भक्त, कार्यक्रर्ते,नेते उपस्थित होते.