
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे…
नांदेड (देगलूर): दिनांक 20/08/2023 वार रविवार इंटरनॅशनल फोनाकोशी शोतोकान कराटे असोसिएशन व सुशिलादेवी देशमुख महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गटांमध्ये चमकदार कामगिरी करत यश संपादन केले त्यामध्ये विद्यार्थ्यांनी शाळेसाठी तीन गोल्ड मेडल एक सिल्वर मेडल व तीन ब्रांच मिडल ची कमाई केली या स्पर्धेत लातूर जिल्ह्यातून जवळपास 250 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्यातून ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दहा वर्षे वयोगट अभिराज लाडाने अकरा वर्ष वयोगट हरीओम दीक्षित व 14 वर्षे वयोगट सुमित शेळगे यांनी गोल्ड मेडल ची कमाई केली तर यशराज भोसले यांनी सिल्वर मेडल मिळवले त्याचबरोबर प्रणिती पाटील श्रीकांत भोसले व पवन साळुंखे यांनी ब्रांच मेडल मिळवले या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक विठ्ठल गुरमे विशाल कांबळे व प्रसाद माळी यांचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश बिरादार मॅनेजिंग डायरेक्टर सुजित बिरादार तसेच सीईओ रामेश्वर सगरे प्राचार्य आम्रपाली सरवदे मॅडम व सर्व शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.