
दै.चालु वार्ता
उस्माननगर प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- दोन डोंगराच्या पायथ्याशी, निसर्गाच्या सानिध्यात स्वयंभू असलेले प्रति केदारनाथ म्हणून ओळखले जाणारे कंधार तालुक्यातील उस्माननगर ( ता. कंधार) येथील खांडीतील महादेव मंदिरात श्रावणात भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
नांदेड ते बिदर राष्ट्रीय महामार्गावर उस्माननगर पासून शिराढोण कडे जाणाऱ्या रस्त्यालगत पूर्वेस खांडीतील महादेव स्वयंभू बसलेल्या नंदी सारखे महादेवाचे जागृत देवस्थान आहे.
श्रावण महिन्यात या परिसरातील अनेक गावांतून विविध जाती, धर्माच्या भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.
भाविकांची नवसाला पावणारा महादेव म्हणून श्रद्धा आहे.
पहाटे पासून रात्री उशिरापर्यंत श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.
प्रति केदारनाथ मंदिरातील मूर्ती सारख्या असणाऱ्या या महादेवाचे जागृत देवस्थान म्हणून परिसरातील भाविकांची मोठी श्रद्धा आहे.
दोन्ही बाजूंनी हिरवा डोंगर, निसर्गाच्या सानिध्यात शांत व प्रसन्न अनुभूती असलेल्या या मंदिरात श्रावण महिन्यासह नेहमीच दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते.
भविष्यात या खांडीतील महादेव मंदिराचा शासनाच्या तिर्थक्षेत्र विकास, निसर्ग पर्यटन स्थळ, म्हणून विकसित केले तर या परिसरातील अनेक गावांतून नवे व्यवसाय संधी, आर्थिक प्रगती होऊ शकते.
राष्ट्रीय महामार्ग मुळे वाहतूक सुकर होत आहे. तेलंगणा, कर्नाटक,भागातून वाहनांची वर्दळ वाढणार आहे.उस्माननगर व शिराढोण दोन्ही गावांच्या मध्यभागी असलेल्या या मंदिराच्या जिर्णोद्धार करण्यात यावा.अशी भाविकांची मागणी आहे. फक्त जिल्हा प्रशासनाने लक्ष दिल्यास हा परिसर नवीन अर्थक्रांती घडवू शकतो.