
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
लोहा : – लोहा तालुक्यातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ दिपक मोटे यांचे लोहा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला.
लोहा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या वतीने लोहा शहरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ दिपक मोटे यांना लोह्याच्या परंपरेनुसार खारीक खोबऱ्याचा हार शाल घालून अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी लोहा शहरासह ग्रामीण भागातील रुग्णालयाच्या सेवेसाठी व डॉ मोटे यांना दीर्घायुष्यासाठी नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी नगरसेवक संदीप दमकोंडवार , नगरसेवक नब्बीसेट , पञकार केशव पाटील पवार , संजय चव्हाण , दिनेश पाटील मोटे, युवा नेते लक्की फुलवरे , सह आदींची उपस्थिती होती.