
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड : – सामाजिक , शैक्षणिक , शेतकरी , बेरोजगार , अन्याय , अत्याचार , विविध मुद्द्यांवर आवाज उठवणारी ज्वलंत चळवळीचे जहाल उदाहरण म्हणजे झुंझार क्रांती सेना होय. 80% समाजकारण व 20% राजकारण असा झुंझार क्रांतीचा जिल्हात बोलबाला आहे. तर याच संघटनेच्या नांदेड जिल्हा शहराध्यक्षपदी आकाश बाराडे यांची निवड करण्यात आली.
यावेळी संघटनेचे नियुक्तीपञ देताना झुंजार क्रांती सेनेचे अध्यक्ष अनिल पाटील होळगे संस्थापक सचिव गजानन चावरे , राहुल पाटील , झुंजार क्रांती सेना नांदेड जिल्हाध्यक्षा भाग्यश्री शताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.